३१ ऑगस्ट भटके-विमुक्त समाज ‘स्वांतत्र्य दिन’

कोल्हापूर :

देशात ३१ ऑगस्ट हा दिवस भारतातील भटके-विमुक्त समाज ‘स्वांतत्र्य दिन’ म्हणून साजरा करतात. १९५२ साली, त्यांना गुन्हेगार ठरवणारा कायदा रद्द होऊनही राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे एवढ्या वर्षांत त्यांच्या सामाजिक परिस्थितीत फरक पडलेला नाही.आजही अनेक कुटुंब पालात राहतात.
तेव्हा हा ‘स्वातंत्र्यदिन’ आता ‘संघर्षदिन’ म्हणून का साजरा करू नये ? अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ब्रिटिशांनी ठराविक जमातींच्या लोकांना जन्मत: गुन्हेगार ठरविणारा हा अमानवी व क्रूर असलेला ‘गुन्हेगार जमाती कायदा-१८७१’ मंजुर केला. साल २००६ ते २००८ या काळात भारत सरकारच्या राष्ट्रीय आयोगाच्या उपलब्ध अहवालाप्रमाणे १८ राज्यांत केलेल्या जलद सर्व्हेनुसार एकूण १३ कोटी पैकी ५४ टक्के भटके-विमुक्त आजही पालात(तात्पुरत्या तंबूत) राहतात. ९८% लोकांना बँकांकडून अर्थसहाय्य मिळत नाही. त्यांचे मागासवर्गीय गटात केलेले शासकीय वर्गीकरण अनेक अंगाने सदोष आहे. त्याना उपलब्ध असलेल्या सोयी-सवलतींचा ते लाभ घेऊ शकत नाहीत. ते एवढे पोरके आहेत की त्याना त्यांची ओळख मिळणेही अवघड जाते.अनेक ठिकाणी अशी भटकी कुटुंब पालात राहतात, त्यांच्या साठी शासनाने तांडा वस्ती सुरू करावी अशी मागणी अनेक वर्षे केली जात आहे.

………….
रामचंद्र पोवार,लमाण समाज,
३१ ऑगस्ट हा आनंदाचा स्वांतत्र्य दिन म्हणून साजरा करण्याऐवजी, व्यवहारात खरे स्वातंत्र्य मिळविण्याचा ‘निर्धार दिन’ आणि अभ्यास व एकजुटीच्या जोरावर ‘संघर्ष/आक्रोश दिन’ म्हणून सुरु करणे योग्य ठरेल!

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!