या गावचे आहेत ते दाम्पत्य, वृद्ध दाम्पत्याचा तिरंगा फडकवतानाचा फोटो झाला होता व्हायरल ,उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही या फोटोची घेतली दखल
कोल्हापूर :
वृद्ध दाम्पत्याचा तिरंगा फडकवतानाचा फोटो व्हायरल झाला होता.
उचगाव येथील मंगेश्वर कॉलनीत राहणाऱ्या हिंदुराव दत्ता पाटील वय ७६ व त्यांच्या पत्नी रुक्मिणी वय ६८ या वृद्ध दाम्पत्याचा तिरंगा फडकवतानाचा तो फोटो होता.त्यांची ही धडपड तरुणांना प्रेरणादायी आहे .
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही या फोटोची दखल घेतली . त्यांनी हा फोटो ट्विट करत वयोवृद्ध दाम्पत्याला सलाम केला आहे .
मूळचे पुनाळ ता . पन्हाळा येथील या पाटील दाम्पत्याने ‘ हर घर तिरंगा ‘ या केंद्र सरकारच्या आवाहनानुसार १३ ऑगस्टला आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावला . तो लावण्यासाठी त्यांची पाच मिनिटे धडपड चालू होती . त्यांना वर चढायला येत नसल्याने पत्नीला बॅरलवर चढवले व ते बॅरल धरून उभे राहिले . पत्नी रुक्मिणी यांनी तिरंगा लावला . याचवेळी त्यांची ही धडपड शेजारी असणारे माळी व चौगले यांनी आपल्या घराजवळून मोबाईलवर फोटो टिपला.
नंतर हे फोटो सोशल मीडियावर टाकले . काही वेळातच ते व्हायरल झाले . हे दाम्पत्य
महात्मा गांधी , पंडित नेहरूप्रेमी आहेत . ते शाहू मिलचे सेवानिवृत्त कामगार आहेत . या उपक्रमामुळे या वृद्ध दाम्पत्याचे अनेकजण कौतुक करत आहेत .