अमृत महोत्सवी स्‍वातंत्र्य दिन ‘गोकुळ’मार्फत उत्साहात साजरा….

कोल्‍हापूर:ता.१५: अमृत महोत्सवी स्‍वातंत्र्य दिनानिमीत्‍य गोकुळ प्रकल्‍प येथे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहन करणेत आले.यावेळी बोलताना विश्‍वास पाटील म्‍हणाले भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.स्वातंत्र्यानंतर भारताने सर्व क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे.१५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे असे मनोगत व्यक्त केले व जिल्ह्यातील दूध उत्पादक,दूध संस्था प्रतिनिधी,वितरक व ग्राहक यांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गोकुळ प्रकल्‍पाबरोबरच ताराबाई पार्क कार्यालय येथील ध्‍वजारोहन संघाचे शशिकांत पाटील- चुयेकर यांचे हस्‍ते तर बोरवडे चिलिंग सेंटर संचालक किसन चौगले, लिंगनूर चिलिंग सेंटर संचालक नविद मुश्रीफ,तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर,गोगवे चिलिंग सेंटर संचालक कर्णसिंह गायकवाड, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक सुजित मिणचेकर, महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल संचालक बाबासाहेब चौगले येथे व महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी येथे संघाचे अधिकारी यु.पी.मगदूम यांच्‍या हस्‍ते व संघाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत करणेत आले.

तसेच देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हर घर तिरंगा या कार्यक्रमा अंतर्गत दि. १३ व १४ ऑगस्टला संघाच्या विविध चिलिंग सेंटर,कार्यालया मध्ये संघाच्या महीला विधवा कर्मचारी तसेच माजी सैनिक व संघाचे कर्मचारी यांच्या हस्ते ध्‍वजारोहन करण्यात आले.

      गोकुळ प्रकल्‍प येथे ध्‍वजारोहनावेळी गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील,शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव ,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदिप पाटील, व्‍यवस्‍थापक प्रशासन श्री.डी.के. पाटील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!