चिमुकल्या हातांनी बांधली पोलिसमामांच्या हातावर राखी
करवीर :
कोपार्डे अंगणवाडी क्र. ९० च्या चिमुकल्यानी विद्यार्थिनींनीकडून करवीर पोलीसांना रक्षाबंधन निमित्त राख्या बांधण्यात आल्या. आमच्या तालुक्याचे आणि पर्यायाने आमच्या गावचे रक्षण करणाऱ्या हातांना नेहमी बळ मिळत राहू दे आणि अशीच सुशासनाची घडी अबाधित राहूदे असा चिमुकला संदेश देत या विद्यार्थिनींनी पोलिसमामांना सुखद अनुभव दिला.
स्वानंदी, स्वरा, सिया शंभवी, परी या मुलींसह मृगेंद्र या विद्यार्थ्यांनी या निमित्ताने करवीर पोलीस स्थानकाला भेट दिली.
यावेळी करवीर पोलीस
निवास पवार आणि त्यांचे सहकारी हजर होते. या कार्यक्रमाचे आयोजन हनुमान सेवा संस्थेचे संचालक सागर पाटील यांच्या साहाय्याने करण्यात आले होते. सेविका सारिका पाटील आणि मदतनीस रेखा पाटील यांनी अंगणवाडी सुपरवायजर अश्विनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडला.