पूर अपडेट : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान साडेतीन फूट पाण्याचे अंतर रात्री किंवा पहाटे रस्त्यावरून पाणी पडण्याची शक्यता
करवीर :
सायंकाळ 7 वाजता 10/8/2022,
कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान अद्याप पुराचे पाणी रस्त्यावर येण्यासाठी साडे तीन ते 4 फूट अंतर आहे, सकाळ पासून सुमारे तीन फूट पाणी वाढले आहे.राधानगरी धरणाचे पाणी येणार असून रात्री दोनवडे बालिंगा दरम्यान रस्त्यावरून पाणी पडेल असे चित्र आहे.
मांडुकली किरवे गगनबावडा येथील रस्त्यावरचे पुराचे पाणी ओसरले आहे.