अपडेट : राधानगरी धरणाचे चार दरवाजे उचलले : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान अद्याप पुराचे पाणी रस्त्यावर येण्यासाठी ६ फूट अंतर
कोल्हापूर :
राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे उचलले आहेत.
यामध्ये 3, 4, 5, 6 नंबरचे दरवाजे उघडले आहेत.

कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे बालिंगा दरम्यान अद्याप पुराचे पाणी रस्त्यावर येण्यासाठी ६ फूट अंतर आहे.तर कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर पुराचे सुमारे एक फूट पाणी आले आहे.