खुपिरेत या महिला होणार एक दिवसाच्या सरपंच व या महिलेच्या हस्ते होणार ध्वजारोहण
कोल्हापूर :
विधवा प्रता मोडून काढण्यासाठी खुपिरे ता करवीर येथील एका पाटील कुटुंबाने घेतलेल्या निर्णयाला ग्रामपंचायत ने प्रतिसाद देत आज कोमल पाटील यांना सरपंच दिपाली जांभळे यांच्या हस्ते साडी चोळीचा आहेर दिला, आणि १५ ऑगस्ट रोजी एक दिवसासाठी त्यांना सरपंच करण्यात येणार असून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे,अशी माहिती दिली, दरम्यान जिल्हासह राज्यभरातील हा पहिला उपक्रम ठरणार असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
येथील वायरमन राम पाटील यांचे बोलोली येथे कामावर असताना काही दिवसापूर्वी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी कोमल पाटील यांना पाटील कुटुंबियांनी विधवा प्रथेला फाटा देत त्यांना सन्मानाची वागणूक देण्याचा निर्णय घेतला. तसेच या ग्रामपंचायतीनेही गावांमध्ये अशा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला, यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने आज सरपंच दिपाली जांभळे व महिला सदस्यांच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन कोमल पाटील यांना हळदीकुंकू लावून साडी चोळीचा आहेर देण्यात आला.
यावेळी बोलताना सरपंच दिपाली जांभळे म्हणाल्या खुपिरे ग्रामपंचायतीच्या वतीने विधवा प्रता बंद करण्याचा ठराव करण्यात आला आहे, कोमल पाटील यांना १५ ऑगस्ट रोजी एक दिवसासाठी सरपंच करण्यात येणार आहे ,व त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे .असा ठराव करण्यात आला आहे, याची मागणी आम्ही पंचायत समिती व जिल्हा परिषदला कळवली आहे.
यावेळी उपसरपंच युवराज पाटील , सदस्य सागर पाटील, भगवान हराळे, अमर कांबळे, शीलाताई चौगले, तृप्ती पाटील, कल्पना कोळी, संगीता कांबळे, वनिता कांबळे, ग्राम विकास अधिकारी तब्बसुम आत्तार , राम चे वडील बळवंत पाटील ,चुलते एस के पाटील, विलास पाटील, अर्जुन पाटील, दिगंबर पाटील, संदीप पाटील, हनमंतवाडी सरपंच संग्राम भापकर उपस्थित होते.