भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचे जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक
Tim Global :
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकाविले.
लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे.
युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नावेळी नीरज चोप्राने ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्य पदक आपल्या नावे केलं. २४ वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.
Olympic champion Neeraj Chopra wins silver medal at World Championship with 88.13m throw in final— Press Trust of India (@PTI_News) July 24, 2022
दरम्यान ग्रेनेडाच्या अँडरसनन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भालाफेक करत पहिलं स्थान मिळवलं. पहिल्या प्रयत्नात त्याने ९०.२१ मीटर आणि त्यानंतर ९०.४६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. सहाव्या प्रयत्नात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली आणि सुवर्णपदक जिंकलं.