Tim Global :

Maharashtra Bus Accident in MP : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या एसटी बसला भीषण अपघात झाला . जळगावच्या अंमळनेरकडे निघालेली ही बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील धार येथे हा अपघात झाला आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने ही बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली. अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून १५ जणांना वाचवण्यात आले आहे.

अपघातग्रस्त बस  महाराष्ट्र एसटी मंडळाची (MH40 N9848) होती. बस सकाळी ७.३० वाजता धार येथून अंमळनेरकडे निघाली होती. खलघाट परिसरात असताना एसटी बस कठडा तोडून नर्मदा नदीत कोसळली.

दुर्घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून सध्या मृतांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
·
Jul 18, 2022
इंदोर-अमळनेर ही ST बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत काही लोकांचे मृत्यू झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मृतांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या संवेदना आहेत.
काही लोकांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे.
Devendra Fadnavis
@Dev_Fadnavis
·
Follow
बचाव कार्य आणि जखमींना उपचारासाठी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाचे अधिकारी मध्यप्रदेश प्रशासनाशी समन्वय ठेवून आहेत.
मी सुद्धा धार जिल्हाधिकारी आणि ST प्रशासनाशी संपर्कात आहे.
शोध आणि बचावकार्य वेगाने केले जात आहे.
जखमींना लवकर आराम मिळो, अशी मी प्रार्थना करतो.
12:34 PM · Jul 18, 2022
306
Reply
Copy link

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी मीडिया शी बोलताना सांगितलं की, “आम्ही दुर्घटनेची सविस्तर माहिती घेत आहोत. महाराष्ट्रातील किती प्रवासी होते याची माहिती मिळण्यास थोडा वेळ लागू शकतो. १३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती आहे”.


अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बचावकार्यावर लक्ष ठेवून…..
अपघाताबद्धल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले, असून बचावकार्य व्यवस्थित पार पाडावे व जखमींवर लगेच उपचारासाठी मध्य प्रदेश मधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!