१९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या शेतीविषयक प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश

मुंबई :

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून मंत्रालयातील आपल्या दालनातून कामकाजास प्रारंभ केला. आज मंत्रालयात दाखल होताच एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सध्या सुरु असलेल्या तसेच मागील काही प्रकल्पांचा आढवा घेतला.

या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज खास बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अॅग्री बिझनेस सोसायट्या निर्माण करुन १९ लाख शेतकऱ्यांना मदत होणाऱ्या शेतीविषयक प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश देण्यात आले.

या प्रकल्पापासाठी जागतिक बँकेने एकूण ३ हजार कोटी रुपयांची मदत केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना दिली.

“२०१९ साली आपण स्मार्ट प्रोजेक्ट (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प ) मंजूर केला होता. त्यानुसार महाराष्ट्रात दहा हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करुन १९ लाख शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन होते. या प्रकल्पाला जागतिक बँकेने ३ हजार कोटी रुपये दिले होते. दुर्दैवाने मागील अडीच वर्षात या प्रकल्पात आपण केवळ १५ कोटी रुपये खर्च करु शकलो.

या प्रकल्पाला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी आज बैठक झाली. या प्रकल्पासंदर्भात एक वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. जागतिक बँकेचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आम्ही पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पिकांची व्हॅल्यू चैन तयार करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून फार फायदा होणार आहे,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
·
Follow
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा.#बाळासाहेबठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (#स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.त्यामुळे त्याला गती देतानाच प्रकल्पाचे कालबद्ध नियोजन करा,असे निर्देश मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दिले. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis उपस्थित होते.
6:48 PM · Jul 7, 2022
231
Reply
Copy link

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!