गोकुळ ग्रामीण पतसंस्‍थेच्‍या चेअरमनपदी शशिकांत पाटील चुयेकर यांची बिनविरोध निवड…

कोल्‍हापूरः ता. ०७.
कोल्‍हापूर जिल्हा ग्रामीण (गोकुळ) सहकारी नागरी पतसंस्‍था लि., कोल्‍हापूर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. त्यानंतर झालेल्या पदाधिकारी निवड बैठकीत मा.शशिकांत पाटील चुयेकर यांची पतसंस्थेच्या चेअरमनपदी, तर ‘ यांची व्हा.चेअरमनपदी आय.ए.पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी नूतन संचालकांचा सत्कार गोकुळ दूध संघाचे चेअरमन व संस्थेचे मार्गदर्शक संचालक विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते करण्यात आला व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाग्यश्री भांडारकर यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना नूतन चेअरमन शशिकांत पाटील (चुयेकर) म्हणाले कि गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी १९८९ साली स्थापन केलेल्या या संस्थेचा मुख्य उद्देश कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना गाय /म्हैस खरेदी करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रे व कमी व्याजदराने प्राथमिक दूध संस्थाना कर्ज पुरवठा करणे हा होता.गोकुळ ग्रामीण पतसंस्थेच्या माध्यमातून प्राथमिक दूध संस्था आणि दूध उत्पादक यांचा विकास हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून कामकाज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

      याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक संचालक गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील , पतसंस्थेचे जेष्ठ संचालक रवींद्र आपटे,गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ,पतसंस्थेचे नूतन संचालक सुभाष चौगले,रामचंद्र चव्हाण, भुजंगराव पाटील,सुनील आमते,श्रीकांत पाटील, मारुती नाईक, निशिकांत कांबळे, संचालिका सौ.रुपाली पाटील ,सौ.जयश्री चौगले,तसेच संस्थेचे व्यवस्थापक भगवान मोरे, लेखपाल आनंदा पाटील.  गोकुळ ग्रामीण पतसंस्‍थेचे अधिकारी आदि उपस्थित होते
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!