बर्की येथे ७० हून अधिक पर्यटक अडकले
शाहूवाडी :
बर्की , शाहूवाडी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे,कासारी नदी भरून वाहत आहे .अचानक नदीला पाणी वाढल्याने बर्की येथे ७० हून अधिक पर्यटक अडकले आहेत.
मुसळधार पावसामुळे बर्की धबधबा प्रवाहित झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली आहे , परंतु अचानक पाऊस वाढल्यामुळे बर्फी बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे सुमारे ७० हून अधिक पर्यटक बर्की येथे अडकले आहेत .
बाहेर पडण्यास अन्य कोणताही मार्ग नाही, यामुळे बंधाऱयावरील पाणी कमी होईपर्यंत पर्यटकांना थांबावे लागणार आहे . असाच पाऊस राहिल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे महसूल विभागाकडून कासारी परिसरातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.