कोल्हापूर जिल्ह्यात ८ जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा

यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचना

कोल्हापूर :

जिल्ह्यात ८ जुलै २०२२ पर्यंत भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.

  आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क ठेवावा.
जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक
०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४
टोल फ्री क्रमांक १०७७
  …

2 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1 हजार क्युसेक विसर्ग

  : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 67.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील- रुई व इचलकरंजी असे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणातून 1 हजार 50 तर अल्लमट्टी धरणातून 451 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 38.88 दलघमी, वारणा 307.99 दलघमी, दूधगंगा 187.26 दलघमी, कासारी 27.19 दलघमी, कडवी 22.06 दलघमी, कुंभी 30.18 दलघमी, पाटगाव 37.56 दलघमी, चिकोत्रा 19.35 दलघमी, चित्री 17.06 दलघमी, जंगमहट्टी 13.99 दलघमी, घटप्रभा  25.96 दलघमी, जांबरे 8.48 दलघमी, आंबेआहोळ 18.51, कोदे (ल.पा) 1.98 दलघमी असा आहे.

   तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.04 फूट, रुई 43 फूट, इचलकरंजी 40, तेरवाड 37.06 फूट, शिरोळ 27 फूट, नृसिंहवाडी 20.06 फूट, राजापूर 10 फूट तर नजीकच्या सांगली 4.06 फूट व अंकली 4.05  फूट अशी आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!