पशुवैद्यकीय सेवा शुल्काची डबल दरवाढ :
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधीचा दणका
राज्यात पशुवैद्यकीय सेवा शुल्काची डबल दरवाढ
शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे
कोल्हापूर :
राज्य शासनाने २१ जून पासून पशुवैद्यकीय सेवेच्या दरामध्ये डबल दरवाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आता कंबरडे मोडणार आहे. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्ह्यात ७१ पदे डॉक्टरांची रिक्त आहेत ,एकीकडे सेवा मिळत नाही, दुसरीकडे सेवा शुल्क वाढले आहे, सेवा शुल्क वाढवण्याऐवजी पदे भरावी आणि शेतकऱ्यांना लुटू नये असा तीव्र संताप शेतकऱ्यांच्यातुन व्यक्त होत आहे. दरवाढीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोट्यावधीचा बुर्दंड बसणार आहे.

दुग्ध व्यवसाय हा जिल्हाचा कणा आहे, दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचा आणि जिल्ह्याचा विकास झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे नऊ लाख जनावरे आहेत, दररोज सुमारे २२ लाख लिटर दूध संकलन होते, येथून संपूर्ण राज्याला दूध पुरवठा केला जातो. जिल्हा परिषदेचे १३९ दवाखाने आहेत या ठिकाणी ७१ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
गेली दोन वर्षे कोविड, आणि लॉकडाऊन आणि शेतमालाचे पडलेले दर , तसेच इंधन दरवाढीने शेती परवडत नसल्याचे चित्र आहे. आता या पशुवैद्यकीय सेवाशुल्क मध्ये दर वाढवून शासनाने आगीत तेल टाकल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या तूंन उमटत आहेत. दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी होत आहे.
२१ जून पासून झालेली दरवाढ अशी,
केसपेपर ऐवजी आता उपचाराला १० रुपये फी, रेतन ४० चे ५० रुपये, सोनोग्राफी पंचवीस रुपयेचे शंभर रुपये, शस्त्रक्रिया करणे २५ रुपयचे शंभर रुपये, रक्त लघवी तपासणी एक रुपयाचे २० रुपये, भाकड जनावरे तपासणी ५१ रुपयेचे दोनशे रुपये, शेतकऱ्यांच्या दारात सेवा दिल्यास ऐच्छिक फी होती, आता दीडशे रुपये दर.
डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद,
२१ जून पासून पशुवैद्यकीय सेवेचे दर वाढले, वीस वर्षानंतर दरवाढ झाली, पावसाळ्यापूर्वी चे लसीकरण सुरू आहे, जंतनाशक मोहीम नियोजित आहे.