कोल्हापूर :
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ मार्चपर्यंत स्थगिती देण्यात आली.हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सहकार खात्याने आज सायंकाळी त्याबाबतचा आदेश काढला आहे . यामुळे जिल्ह्यातील गोकुळ , जिल्हा बॅंक, राजाराम, दत्त , शरद या साखर कारखान्यांंसह सुमारे एक हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया थांबणार आहे. गेल्या मार्चपासून सहावेळा निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. गोकुळची प्रारूप यादी प्रसिध्द झाली आहे. त्यावर हरकत दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस होता. तर जिल्हा बॅंकेची ठराव संकलनाची प्रक्रिया संपली असून यादी तयार करण्यासाठी हे ठराव बॅंकेकडे देण्यात आले आहेत. संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी संपलेल्या बहुंताशी साखर कारखाने व संस्थांची प्रक्रिया सुरू होती, आता ही प्रक्रिया ३१ मार्चपर्यंत थांबणार आहे.