आयुर्मर्यादा संपलेल्या पुलाची डागडुजी
बालिंगा दोनवडे रिव्हज पुल
कोल्हापूर :
ब्रिटिशांच्या काळात तळकोकणात व्यापार करण्यासाठी गगनबावडा मार्गे भोगावती नदीवर बालिंगा दोनवडे दरम्यान ब्रिटिश गव्हर्नर रीव्हज यांनी पूल बांधला, छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन झाले होते. या पुलाला सुमारे १३० वर्षे होत आहेत. पावसाच्या तोंडावर शंभर वर्षाची आयुर्मर्यादा असलेल्या पुलाची बांधकाम खात्याकडून दुरूस्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर गगनबावडा मार्गे दररोज सोमवारी ३१ हजार टन अवजड वाहतूक होते, कोल्हापूर गोव्याला जाण्यासाठी पर्यटक आणि प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. या मार्गावरून कुंभी डीवाय भोगावती राजाराम या कारखान्याची ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते.
अरुंद रस्ता असल्यामुळे मोठे अपघात होतात.
दहा वर्षापूर्वी पुलाचे कोट्यवधी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली होती, यानंतर पुलाच्या पूर्वेकडील एक दोन तीन तीन पायामध्ये पिलरच्या दरजा रिकाम्या झाल्या होत्या, या पुलाचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट केले होते, पुलाला धोका निर्माण झाला होता. सध्या दोन नंबरच्या पिलर मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त होता या पिलरला जेकेटिंग करून दरजा भरण्यात आल्या आहेत, गेली दोन महिने दुरुस्तीचे काम सुरू होते.
भोगावती नदीला मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह वाहत असतो मोठ्या प्रमाणात पूर येतो, पूर्वेच्या बाजूने मुरूम टाकून वाट करण्यात आली आणि पुलाची दुरुस्ती तातडीने करण्यात आली आहे.
दरम्यान कोल्हापूर गगनबावडा नॅशनल हायवे खात्याकडे हा मार्ग वर्ग झाला असून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे या दरम्यान पुलाला पर्यायी पूल बांधण्यात येणार असल्याचे संबंधित खात्याने सांगितले आहे. या मार्गावर अकरा ठिकाणी पुराचे पाणी येते यामुळे मार्ग बंद होतो याठिकाणी ब्रिज करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
युवराज बाळासो पाटील दोनवडे,
पुलाच्या पिलरची दुरूस्ती करण्यात आली आहे, पिलर दुरुस्तीला मुरूम टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह आमच्या मळ्याच्या बाजूने आल्याने मळा तुटून गेला आहे, नुकसानभरपाई मिळावी. नवीन रस्ता रुंदीकरणासाठी अद्याप हस्तांतराचा नोटीस आल्या नाही ,शेतजमीन रुंदीकरणात जाईल याची आताच्या बाजार भावा प्रमाणे नुकसानभरपाई मिळावी.