उद्या १७ जून रोजी :
माध्यमिक शाळांत  इ.१० वी परीक्षेचा निकाल

मुंबई :

Maharashtra SSC Result 2022 Online
Maharashtra Board SSC Result 2022 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.  शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे.

परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी केली होती , पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी १ वाजल्या नंतर उपलब्ध होतील.

या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck.ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशी देखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Prof. Varsha Eknath Gaikwad
@VarshaEGaikwad
·
Follow
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.
#SSC #results
@CMOMaharashtra

1:41 PM · Jun 16,

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. आपल्या सर्वांना माहीत आहोत, की आपण सगळेजण दोन वर्षांपासून करोनाशी लढत आहोत. अशावेळी या परीक्षा घेण्यात आल्या, खूप मेहनतीने, कष्टाने, जिद्दीने, धैर्याने आणि संयमाने आपण आपला अभ्यास पूर्ण केला आणि या परीक्षेला सामोरे गेलात. आपल्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असेल आणि विद्यार्थी किंवा पालकवर्गात थोडं टेंशनही असेल, की परीक्षेचा निकाल कधी लागणार. तर, मी आजच्या या संवादातून सांगू इच्छिते की इयत्ता दहावीचा निकाल १७ जून(उद्या) दुपारी १ वाजता ल लागणार आहे. खाली दिलेल्या विविध संकेतस्थळाच्या माध्यामतून तुम्ही हा निकाल पाहू शकता.आपण केलेल्या अभ्यासाला यश मिळणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना मी आज सर्व विद्यार्थी आणि पालकांना हीच शुभेच्छा देते, की उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदमय आणि उत्साहचा असो.”

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याबाबत समस्त विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता होती.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!