दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे निकाल या महिन्यात जाहीर होणार असल्याची घोषणा

नागपूर :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे निकाल या महिन्यात जाहीर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. त्या शिर्डी येथे आयोजित ‘काँग्रेस नवसंकल्प कार्यशाळा’ या कार्यक्रमात बोलत होत्या.

इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याबाबत विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि एकूणच शैक्षणिक वर्तुळात उत्सुकता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबातब माहिती देताना सांगितले की, “इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागणार आहे. तर त्यानंतर अवघ्या १५ दिवसांममध्ये इयत्ता दहावीचा निकालही जाहीर होईल.”

नागपूर विभागातून इयत्ता बारावीच्या १ लाख ६० हजार ५१९ विद्यार्थ्यांची परीक्षा दिली तर इयत्ता दहावीच्या १ लाख ५८ हजार ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून आता विद्यार्थी आणि पालकांनाही निकालाची उत्सुकता लागली आहे. निकाल जाहीर व्हायला असला तरी शिक्षण विभागाने शहरी भागातील अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे हे विशेष.

दरम्यान, करोना संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा प्रत्येक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच परीक्षा घेतल्या. परंतु, विभागातील बहुतांश शाळांनी शिक्षण मंडळाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा निकालात वाढ होण्याची शक्यता आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!