पाऊस : शेतीची कामे उरका, ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला
Tim Global :
पाऊस : ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचं , मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात १६ मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या १७ मे रोजीच पावसाचं आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.
K S Hosalikar
@Hosalikar_KS
18 May:#SWMonsoon has further advanced into some more parts of SE BoB, entire A& N Islands,entire Andaman Sea & some more parts of EC B0B
नैऋत्य मान्सून संपूर्ण अंदमान निकोबार बेटे,संपूर्ण अंदमान समुद्र, दक्षिण-पूर्व / पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे.
होसाळीकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये २७ मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.