महाराष्ट्र लोकसेवा आयोग : शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील ८ संवर्गातील एकूण १६१ पदांच्या भरतीकरिता
Tim Global :
महाराष्ट्र लोकसेवा आयोग : शासनाच्या विविध विभागांतर्गत पुढील गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील ८ संवर्गातील एकूण १६१ पदांच्या भरतीकरिता ‘राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२’ दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. याची जाहिरात क्र. ०४५/२०२२ अशी आहे. गट ‘अ’ संवर्गातील एकूण पदे – ५९ पदे आहेत.
जागा….
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ – एकूण ९ पदे (अजा-१, अज – ३, इमाव – १, खुला झ्र् ४ )
(२) मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ – २२ पदे (अजा- ४, अज- १, विजा-अ- १, इमाव- ४, भज क-१, ईडब्ल्यूएस- २, खुला- ९) (१ पद कर्णबधिरता / ऐकू येण्यातील दुर्बलता यांचेसाठी राखीव).
(३) बाल विकास प्रकल्प अधिकारी गट अ – २८ पदे (अजा -२, अज-२, विजा अ-२, इमाव- ८, विमाप्र-१, ईडब्ल्युएस- ३, खुला – १०) (१ पद कर्णबधिरता / ऐकू येण्यातील दुर्बलता यांचेसाठी राखीव).
गट ‘ब’ संवर्गातील पदे……
एकूण १०२
(४) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – २ पदे (अजा-१, खुला-१).
(५) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ३ पदे (खुला).
(६) कक्ष अधिकारी – ५ पदे (अजा – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस – १, खुला – २)
(७) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी – एकूण ४ पदे (अजा- १, इमाव- १, खुला- २).
(८) निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे गट ब – एकूण पदे ८८ (आरक्षण निहाय तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उमेदवाराला उपलब्ध करून देण्यात येईल.)
पात्रता : सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब पद वगळता इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी अथवा समतुल्य अर्हता
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ पदासाठी – वाणिज्य शाखेची पदवी किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण किंवा वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा एम्.बी.ए. किंवा C.A./ICWA
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब पदासाठी – बी.एस्सी. (फिजिक्स आणि मॅथ्स) किंवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
(पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत पूर्व परीक्षेस पात्र आहेत. मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक.)
वेतन श्रेणी : पद क्र. १ ते ३ (गट अ) साठी S२० रु. ५६१०० – १७७५०० पद क्र. ४, ५, ६ (महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील पदे) गट ब साठी र१५ (४१८०० – १३२३००); कक्ष अधिकारी (मंत्रालयीन विभागातील पदांसाठी) र१७ (४७६०० – १५११००); पद क्र. ७ साठी र१६ (४४९०० – १४२४००); सर्व पदांसाठी मूळ वेतनावर नियमाप्रमाणे देय भत्ते दिले जातील.
वयोमर्यादा : १ सप्टेंबर २०२२, रोजी १९ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय अनाथ/ ईडब्ल्यूएस – ४३ वर्षे, दिव्यांग-४५ वर्षांपर्यंत).
१ मार्च २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत वयाधिक ठरणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. सर्व पदांसाठी विकलांग उमेदवार पात्र आहेत.
शारीरिक मोजमापे :
१) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब पदासाठी – उंची – पुरुष – १६३ सें.मी., महिला – १६३ सें.मी.; छाती – पुरुष – ७९-८४ सें.मी. चष्मासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी किंवा रंग आंधळेपणा नसावा.
२) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब या पदासाठी पुरुष उंची किमान – १६५सेंमी., छाती – ७९-८४ सेंमी.,
महिला उंची किमान -१५५ सेंमी.
पात्र उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे https://mpsconline.gov.in या संकेत स्थळावर उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे परीक्षेपूर्वी ७ दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येतील. त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
निवड पद्धती : परीक्षेचे टप्पे-तीन
(१) पूर्व परीक्षा – ४०० गुण, (२) मुख्य परीक्षा गुण – ८००गुण (३) मुलाखत – १०० गुण.
मुलाखतीसाठी निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होईल.
पूर्व परीक्षा- वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची मराठी/इंग्रजी माध्यमातून परीक्षा
पेपर-१ : १०० प्रश्न एकूण २०० गुण, वेळ – २ तास पेपर-२ – ८० प्रश्न एकूण २०० गुण, वेळ – २ तास
पेपर-२ : दोन्ही प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांच्या चुकीच्या उत्तरामागे प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येतील.पूर्व परीक्षेच्या दोन पेपर्सपैंकी पेपर-२ चे गुण अर्हताकारी ( Qualifying) स्वरूपाचे असून सदर पेपरमध्ये ३३% गुण प्राप्त करणा-या उमेदवारांचा पेपर-१ मधील गुणांच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी गुणांची किमान सीमारेषा निश्चित करण्यात येईल.
पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी दिलेल्या ३७ परीक्षा केंद्रांपैकी कोणतेही एक केंद्र ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करताना निवडणे आवश्यक आहे. पूर्व परीक्षेतील कामगिरीवर आधारित रिक्त पदांच्या १२ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी निवडले जातील.
२) मुख्य परीक्षेचे टप्पे दोन (१) लेखी परीक्षा – ८०० गुण (२) मुलाखत – १०० गुण
एकूण प्रश्नपत्रिका – ६
(१) भाषा पेपर-१ – मराठी ५० गुण, इंग्रजी ५० गुण, वेळ -३ तास पारंपरिक/वर्णनात्मक स्वरूप.
(२) भाषा पेपर-२ – (१) मराठी ५० प्रश्न, ५० गुण, (२) इंग्रजी ५० प्रश्न, ५० गुण, वेळ -१ तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (३) सामान्य अध्ययन – १, (४) सामान्य अध्ययन -२, (५) सामान्य अध्ययन – ३, (६) सामान्य अध्ययन – ४, प्रत्येकी १५० प्रश्न १५० गुण, वेळ -२ तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी माध्यम मराठी व इंग्रजी. ( रिक्त पदांच्या प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी सुमारे ३ पट उमेदवार मुलाखतीकरिता निवडले जातील.) मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे तसेच संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदाचा पसंती क्रम सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या प्रसिद्धीच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत ऑनलाइन पद्धतीने देणे आवश्यक राहील.
अंतिम निकाल : लेखी परीक्षा (मुख्य) आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ता क्रमानुसार यादी तयार करण्यात येईल.
विजा अ भज ब भज क, विमाप्र, इमाव या प्रवर्गातील उन्नत व प्रगत गटात (क्रीमी लेयर) मोडणाऱ्या उमेदवारांना आरक्षणाचा व वयोमर्यादेचा फायदा देय नसल्यामुळे त्यांनी अमागास उमेदवारांप्रमाणे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
पूर्व परीक्षा शुल्क : रु. ५४४/- अमागास व रु. ३४४/- मागासवर्गीय/आदुध/अनाथ ऑनलाइन पद्धतीने फी भरण्याचा अंतिम दिनांक आहे १ जून २०२२ (२३.५९ वाजेपर्यंत). ऑफलाइन पद्धतीने SBI चलानने फी भरण्यासाठी अंतिम दिनांक आहे ४ जून २०२२. (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत.) त्यासाठी चलनाची पिंट्र दि. ३ जून २०२२(२३.५९ वाजेपर्यंत) घेणे आवश्यक.
परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना – परीक्षा योजना – राज्य सेवा परीक्षा)
अराखीव महिला, खेळाडू,दिव्यांग, मा.सै. व अनाथ आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे/कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही.
पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू, दिव्यांग व अनाथ आरक्षणाचा दावा करणा-या उमेदवारांव्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन अर्ज https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर दिनांक १ जून २०२२ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.