पहिले वर्ष संकल्पपूर्तीचे : चेअरमन विश्वास पाटील ( सत्तांतरानंतरच्या पहिल्या वर्षपूर्तीचा आढावा सादर
कोल्हापूर :
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ मध्ये सत्तांतर होऊन एक वर्ष पूर्ण झाली. सत्तातारानंतर चेअरमन म्हणून माझ्याकडे नेतेमंडळीनी धुरा दिली. या वर्षभरात गोकुळने घेतलेले निर्णय, राबविलेल्या विविध योजना, प्रभावी कामकाज, संचालक मंडळाचा काटकसरीचा कारभार आदींची सर्वांना माहिती होणे गरजेचे आहे. पहिले वर्ष हे खऱ्या अर्थाने संकल्पपूर्तीचे ठरले असल्याचे प्रतिपादन चेअरमन विश्वास पाटील यांनी केले.
जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघात वर्षभरापूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्तांतर होऊन चेअरमन म्हणून विश्वास पाटील यांनी कार्यभार हाती घेतला. या वर्षपूर्तीचा आढावा घेण्यासाठी ताराबाई पार्क येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चेअरमन पाटील यांनी कामकाजाचा संपूर्ण आढावा घेतला.
चेअरमन पाटील यांनी संघाच्या वार्षिक वाटचालीचा आढावा घेताना संघाची वार्षिक उलाढाल रू.२९२९ कोटी इतकी आहे. या वर्षामध्ये म्हैस दुधाकरिता ४ रुपये व गाय दुधाकरिता ३ रुपये वाढ. संघाचा सरासरी प्रति लिटर दूध खरेदी दर म्हैस दुधासाठी ४९ रूपये ७५ पैसे तर गाय दुधासाठी ३१ रूपये १९ पैसे इतका आहे. संघाच्या कामकाजात सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचेही सांगितले.
या पत्रकार बैठकीत वीस लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणे, जनावराची गाभण तक्रार निवारण्यासाठी फर्टीलिटी फीड खाद्याची निर्मिती करणे, जनावरासाठी कृत्रिम गर्भ प्रत्यारोपण (IVF ) राबविणे आदीं गोष्टींचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
पत्रकार परिषदेला राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके,शशिकांत पाटील, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरीशसिंह घाटगे,तज्ञ संचालक युवराज पाटील, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले व संघाचे अधिकारी उपस्थित होते.