कोपार्डे येथे बैलगाडीतून वाजत गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत
कोल्हापूर :
कोपार्डे ता करवीर येथे बैलगाडीतून वाजत गाजत पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच शारदा पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर पाटील प्रमुख उपस्थित होते.

गावाच्या बाहेर कमानी पासून शाळेपर्यंत पहिलीच्या सत्तावीस विद्यार्थ्यांना बैलगाडी सजवून बैलगाडीत बसवून वाजत गाजत आणण्यात आले.
यावेळी बोलताना सागर पाटील म्हणाले गेली दोन वर्षे कोविड मुळे अंगणवाडी ची शाळा बंद होत्या ,यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास खुंटला आहे, पुढे जूनला सुरू होणाऱ्या शाळेसाठी ६० दिवसात पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांना आयडिया कार्ड, स्मार्ट मातांची निवड, करून मेळावा घेण्यात आला.
यावेळी नाव नोंदणी, शारीरिक विकास, बौद्धिक, सामाजिक, भावनिक विकास, भाषा विकास, गगन पूर्ण तयारी ,माता मार्गदर्शन, असे स्टॉल मांडून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी रांगोळी काढून नवीन इमारतीत विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रम झाला.
यावेळी नूतन पाटील, उपसरपंच सरकार जामदार , नामदेव पाटील, शरद पाटील, मुख्याध्यापक विलास कांबळे ,शिक्षिका वैशाली वाडेकर ,महिंद्र स्वामी सर्व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.