पत्नीच्या उपचारासाठी पती करतोय रक्ताचे पाणी : शेती घहाणवट ; तरीही अपुरा पडतोय पैसा, आर्थिक मदतीचे कांचनवाडी येथील भोसले कुटुंबीयांचे आवाहन
करवीर :
कांचनवाडी (ता. करवीर) येथील सौ. सुधा धनाजी भोसले (वय ५० वर्षे) यांची नोव्हेंबर,२०२१ मध्ये किडनी (Transplant ) पुनंरोपण करण्यात आले . त्यात गेली ४५ दिवस झाले त्यांना निमोनिया झाल्यामुळे कोल्हापूर किडनी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (डायमंड हॉस्पिटल) येथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत १७ लाख रु. खर्च आला असून त्यांना आणखी एक महिना उपचाराची आवश्यकता आहे. पत्नीच्या उपचारासाठी पती धनाजी उर्फ डी.बी.भोसले यांनी रक्ताचे पाणी करून पै पै जमवले. प्रसंगी शेती घहाणवट ठेवून कर्ज काढले. जंगजंग पछाडले तरीही उपचाराचा खर्च भागेनासा झाला आहे. त्यामुळे हतबल झालेल्या भोसले कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
रुग्ण सुधा भोसले या सध्या रुग्णालयात ICU मध्ये असून व्हेंटिलेटरवर आहेत. गेल्या दीड महिन्यात प्रचंड महागडी औषधे व उपचार पध्दतीने भोसले कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्ण कंगाल झाले आहे. अगतिक झालेल्या भोसले कुटुंबीयांना सध्या आर्थिक मदतीची खूपच जास्त गरज आहे. आपल्या आर्थिक मदतीने सौ.सुधा यांना सुरळीत उपचार मिळून त्या पुन्हा नव्याने आपल्या संसाराला सुरुवात करतील. त्यामुळे समाजातील दातृत्वशील नागरिकांनी सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.
माझ्या धर्मपत्नीला वाचवण्यासाठी जंगजंग धडपडत आहे. माझी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही मी माझ्या पत्नीच्या उपचारासाठी झुंज देत आहे. शेती गहाणवट ठेवली असून जिथे जिथे कर्ज मिळते तिथे कर्ज उपसले आहे. पण आता मी हतबल झालो आहे. आपल्यासारख्या सामाजिक भान असणाऱ्या व्यक्तीकडून आम्हाला आर्थिक हातभाराची गरज आहे. पेशंट नक्की आपल्या हातून होणाऱ्या आर्थिक मदतीवर बरा होईल याची मला खात्री आहे. तुमच्या सढळ हाताने होणाऱ्या मदतीसाठी मी कृतज्ञ व कृतार्थ आहे. आपली मदत श्री. धनाजी भवाना भोसले रा. कांचनवाडी ता. करवीर बँक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कांचनवाडी A/C 041511002000261 ifsc- IBKL0463KDC या पत्त्यावर पाठवावी, ही विनंती. — धनाजी उर्फ डी.बी.भोसले.