यशवंत सहकारी बँक १५ टक्के लाभांश देणार, बँकेस तीन कोटीचा नफा : अध्यक्ष एकनाथ पाटील
कोल्हापूर :
कुडित्रे तालुका करवीर श्री यशवंत सहकारी बँकेस संपलेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी ९६ लाख नफा झाला, बँकेचा एनपीए शून्य टक्के असून ठेवी मध्ये १२ टक्क्यांनी वाढ होऊन १४० कोटी सात लाखाच्या ठेवी झाल्या आहेत, बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत असून सभासदांच्या हितासाठी १५ टक्के लाभांश देण्याचा मानस आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी दिली.

यावेळी अध्यक्ष पाटील म्हणाले, संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने उत्कृष्ट कामगिरी करत २३८ कोटी ८० लाखाचा एकत्रित व्यवसाय केला आहे,ठेवी मध्ये १२ टक्क्यांनी वाढ होऊन १४० कोटी सात लाखाच्या ठेवी झाल्या आहेत, कर्जामध्ये २५ टक्के ची वाढ होऊन,९८ कोटी ७३ लाख वितरित केले आहे. बारा वर्षे सलग शून्य टक्के एन पी ए असून तरतूद वजा निव्वळ नफा एक कोटी ४१ लाख रुपये आहे.
यावेळी पुढे पाटील म्हणाले मराठा समाजातील होतकरू युवकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळ मागास विकास योजना लागू केली असून या अंतर्गत कर्ज वितरित केले आहे, तसेच बँकेमध्ये ग्राहकांना आरटीजीएस एनईएफटी एटीएम अशा आधुनिक सुविधा दिल्या आहेत , मे २०२२ अखेर मोबाईल बँकिंग सेवा सुरू करण्यात येणार आहे तसेच,तसेच तीन नवीन शाखा सुरू करण्याचा मानस आहे.
गेल्या पाच वर्षात एकत्रित व्यवसाय १२१ कोटी वरुन २३९ कोटी वर करण्यात यश आले आहे. तसेच यापुढे आणखी एक एटीएम सुरू करण्यात येणार आहे.
यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव तोडकर, संचालक आनंदराव पाटील, सर्जेराव पाटील, एस के पाटील, प्रा टी एल पाटील, सुभाष पाटील, नामदेव मोळे,बाजीराव खाडे , प्रकाश पाटील, उत्तम पाटील, एस के पाटील, पांडू पाटील, संग्राम भापकर,प्रकाश देसाई ,राजू पाटील, निवास पाटील, युवराज कांबळे ,आनंद जांभुळकर, सुरेश अपराध, भगवान सूर्यवंशी,
स्नेहलता पाटील,राजश्री भोगावकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस कांबळे सर्व संचालक उपस्थित होते.