कुंभी कारखान्यात परिवर्तनासाठी एकजुटीने लढू :
राजर्षी शाहू आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार
कोल्हापूर :
कोणत्याही परिस्थितीत कुंभी कासारी साखर कारखान्यात परिवर्तन घडवून आणायचे आहे. सभासद शेतकरी, कामगार व संस्थेच्या हितासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे. यासाठी सर्व सत्ताधारी नरके पॅनेल विरोधी कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी एकजुटीने व प्रामाणिकपणे आगामी निवडणुकीला सामोरे जाऊया आणि लढूया, अशा पध्दतीच्या उत्स्फूर्तपणे भावना कोपार्डे (ता.करवीर) येथे झालेल्या राजर्षी शाहू आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी मांडून कुंभी कारखान्याच्या निवडणुकीचे अप्रत्यक्षपणे रणशिंग फुंकले आहे.
मेळाव्यात यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील
, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे , माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, ऍड. प्रकाश देसाई आदिंनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी यशवंत बँकेचे उपाध्यक्ष हिंदूराव तोडकर, संचालक आनंदराव पाटील, सुभाष पाटील, टी.एल. पाटील कुंभीचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, माजी संचालक एस.के.पाटील, दादूमामा कामिरे, नामदेव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.