सांगरुळ येथे रविवारी निकाली कुस्त्यांचे मैदान
प्रथम क्रमांकाच्या दोन लढतीसह शंभरावर कुस्त्यांचे आयोजन : संग्राम पाटील व शुभम सिदनाळे आणी विक्रम शेटे व नागेश पुजारी यांच्यात लढत
करवीर :

सांगरूळ ता. करवीर येथील छत्रपती शाहू नाळे तालीम मंडळाच्या वतीने रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित केले आहे .अशी माहिती कुस्ती मैदानाचे मुख्य संयोजक उपसरपंच सुशांत नाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली .
कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने होणाऱ्या या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या दोन लढती आयोजित केल्या असून यामध्ये सेनादलचा पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन पै . संग्राम पाटील (आमशी ) विरुद्ध महान भारत केसरी शुभम सिदनाळे (शिवराम दादा तालीम पुणे ) आणि ऑल इंडिया चॅम्पियन पै .विक्रम शेटे ( व्यंकोबा मैदान इचलकरंजी ) विरुद्ध कर्नाटक केसरी पैलवान नागेश पुजारी (ता .शाहुपुरी ) यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे .
दोन नंबरची लढत महाराष्ट्र चॅम्पियन पै .प्रशांत जगताप (इचलकरंजी)विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पै . सतपाल नागटिळक (गंगावेश ) तृतिय क्रमांकाची लढत सुरज मुंडे (शाहू कुस्ती संकुल ) विरुद्ध पैलवान पवन कुमार (हनुमान आखाडा दिल्ली) तसेच पै बाबा रानगे (मोतीबाग ) विरुद्ध पै .अक्षय शिंदे (शाहू कुस्ती संकुल ) पै . सनिकेत राऊत (पडळ )विरुद्ध पै .सनीराज पाटील (माळवाडी ) पै .एकनाथ बेंद्रे (शाहू कुस्ती केंद्र ) विरुद्ध पै . विजय पवार (शिवराम दादा तालीम पुणे )पै . भगतसिंग खोत ( माळवाडी ) विरुद्ध पै . अतुल हिरवे (अंबप ) पै . प्रवीण पाटील (चाफोडी )विरुद्ध पै .सौरभ माळी ( इचलकरंजी) या प्रमुख लढती बरोबरच पै . किरण मोरे (कोगे ) विरुद्ध पै . ओंकार रणदिवे (सांगली )पै साई सुतार (शाहू तालीम सांगरूळ ) विरुद्ध पै . सतीश चव्हाण (अकलूज ) या चषकासाठी अटीतटीच्या लढती होणार आहेत . पै . स्नेहल पाटील (आमशी ) विरुद्ध पै .वैष्णवी पाटील (शा .कु .केंद्र )पै प्रज्ञा लोकरे(शा .कु .केंद्र ) विरुद्ध पै श्रेया बावुचकर (हुपरी ) या महिला कुस्त्या आयोजित केल्या आहेत
मैदानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रा. जयंत आसगावकर ,माजी आमदार चंद्रदीप नरके, गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, युवा सेना समन्वयक अनिकेत घुले ,गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, अजित नरके ,निवास वातकर,सरपंच सदाशिव खाडे या प्रमुख मान्यवरासह परिसरातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत . तसेच हिंदकेसरी दीनानाथ सिंह ,विनोद चौगुले यांचेसह जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल उपस्थित
राहणार आहेत.
सांगरूळ परिसरात अनेक वर्षानी मोठे कुस्ती मैदान होत असल्याने कुस्ती शौकिनांच्या त उत्साहाचे वातावरण आहे.प्रेक्षकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कुस्त्या व्यवस्थित पाहता याव्यात यासाठी संयोजकांनी सांगरूळ च्या बाजारवाडा येथील भव्य पटांगणावर खास कै नानाजी लक्ष्मण नाळे कुस्ती आखाडा तयार केला आहे .प्रमुख लढती बरोबरच शंभरावर चटकदार प्रेक्षणीय कुस्त्या आयोजित केल्या आहेत .
कुस्ती मैदानाचे औचित्य साधून कुस्ती क्षेत्रासाठी योगदान दिलेल्या गावातील सर्व जेष्ठ माजी मल्ल व वस्ताद यांचा संयोजकांच्या वतीने सन्मान केला जाणार आहे .परिसरातील कुस्ती शौकीनानी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे .
यावेळी पै दत्ता नाळे, पै. आण्णा नाळे , सदाशिव नाळे, कृष्णात नाळे, एकनाथ नाळे, विश्वास नाळे, बाबुराव नाळे, बाळासो नाळे ,अनिल घराळ ,मच्छिंद्र मगदूम ,सचिन नाळे, अमित नाळे, राहुल नाळे यांचेसह शाहू नाळे तालीम मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .