सर्व नागरिकांनी स्वयंमस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी व्हावे
आंदोलन अंकुश चे वीज ग्राहकांना आवाहन
शिरोळ तहसील कार्यालयावर सोमवारी आंदोलन अंकुश च्या वतीने निदर्शने करण्यात येणार
कोल्हापूर :
गेली आठवडा भर महावितरण कडून वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांना वेठीस धरले जात असून वीज ग्राहक आर्थिक अडचणीत आहे,हे माहित असूनही बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन कट करतो. असे धमकाऊंन जोर जबरदस्तीने बिल वसुल केली जात आहेत.या बद्दल महावितरण व राज्य शासनाच्या विरोधात सोमवारी शिरोळ तालुक्यामध्ये बंद पाळून
सर्व नागरिकांनी स्वयंमस्फूर्तीने बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलन अंकुश संघटनेने वीज ग्राहकांना केले आहे.तसेच शिरोळ तहसील कार्यालयावर सोमवारी आंदोलन अंकुश च्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राज्य शासन वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडून तर दिले आहेच पण थकीत बिल वसुली कनेक्शन तोडून करण्यास खुली छुट् महावितरण ला दिली आहे.
लॉक डाऊन काळातील आलेली भरमसाठ बिले,
चुकीची आकारण्यात आलेले इतर कर, बेकायदेशीर आकारण्यात आलेला स्थिर आकार ,
आणि 18% व्याज दंड व्याज आकारून आलेली बिल दुरुस्त न करता वीज बिल भरा म्हणून ग्राहकांवर होत असलेला अन्याय हा सहन न होणारा आहे.
त्याच बरोबर ज्या ग्राहकांनी वीज बिलाच्या तक्रारी केल्या आहेत त्यांची ही कनेक्शन बळजबरी ने कट करणे तसेच घरगुती वीज ग्राहकांना नोटीस न काढता आज शिरोळ तालुक्यातील काही गावात वीज कनेक्शन कट करण्याच्या महावितरण च्या बेकायदेशीर कृती विरोधात
त्याचबरोबर राज्य शासन अडचणीत असणाऱ्या ग्राहकांना सवलत न देण्याच्या कृती विरोधात सोमवार दि. 22 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही शिरोळ तालुका बंद करण्याचे, जनतेला आवाहन करण्यात आले आहे.
नागरिक व्यापारी उद्योजक अशा सर्व घटकानी या बंद सामील होऊन महावितरण विरोधात असणारा आक्रोश दाखवून द्यावा.
तसेच सोमवारी मा तहसीलदार यांना भेटून बेकायदेशीर कृती करणाऱ्या महावितरण च्या अधिकाऱ्यांना बोलावून ताकीद द्यावी म्हणून आग्रह धरणार तसेच तहसील समोर निदर्शने करण्यात येणार आहेत.अशी माहिती आंदोलन अंकुश चे
धनाजी चूडमुंगे यांनी दिली आहे.