कृषि सेवा केंद्र चालकांनी शेतक-यांना चांगली सेवा द्यावी
जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर :
खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र चालकांनी बी-बियाणे, खत व किटकनाशके अधिनियमांचे पालन करून व्यवसाय करावा व शेतक-यांना चांगली सेवा द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या.
खरीप हंगाम २०२२-२३ नियोजन व खत उपलब्धता संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये खरीप हंगाम २०२३ साठी खत पुरवठ्याचे नियोजन व मागणीबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ई-पॉस अहवालानुसार युरिया २०.९६० मे. टन, डि ओ पी ४६३० मे.टन, एम ओ पी ५३८३ मे.टन, संयुक्त खते १५.९६८ मे.टन., एस एस पी ८५९९ मे. टन असा एकूण ५५ हजार ५४८ मे.टन शिल्लक साठा आहे. ई-पॉश वरून खताची विक्री न करणाऱ्या व ऑफलाईन खत विक्री करणाऱ्या अशा खत विक्री कृषि सेवा केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या. खरीप हंगाम २०२२-२३ साठी नियोजन युरिया ८० हजार ००० मे. टन, डि.ए. पी. २२ हजार २०० मे टन., एम. ओ. पी. २५ हजार ६०० मे. टन, संयुक्तखते ७५ हजार ३०० मे. टन, एस एस पी २५ हजार मे. टन असे एकुण २ लाख २८ हजार १०० मे टन खत पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२२-२३ करीता लागणा-या बियाण्यांची मागणी व नियोजन सादर करण्यात आले. यामध्ये एकूण २५.९८२ क्विंटल महाबीज व राष्ट्रीय बिज निगम यांच्याकडून १३.९८९ क्विंटल खासगी बियाणे उत्पादक कंपनी असे एकूण ३९.९७१ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. खरीप २०२१-२२ मधील ग्राम बिजोत्पादन मोहिमेव्दारे शेतक-यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले एकूण अंदाजीत २८ हजार ५०० क्विंटल सोयाबीन बियाणे उपलब्ध होणार आहे.
मिश्र व संयुक्त खताचा तुटवडा असून भविष्यात देखील तुटवडा भासणार आहे. त्यामुळे शेतक-यांनी सरळ खताचा उदा. सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटेंश इ. वापर करावा, यासाठी कृषी विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.
सन २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील सर्व निरीक्षकांनी काढलेल्या बियाण्यांचे २७ नमुने, खतांचे ५६ नमुने व किटकनाशकांचे ७ नमुने कोर्टकेस पात्र होते. यापैकी २७ बियाणे कोर्ट केस दाखल करण्यात आल्या. खतामध्ये एकूण ११ कोर्टकेस व किटकनाशकामध्ये २ कोर्ट केस दाखल करण्यात आल्या. खताची विक्री पॉश मशिनव्दारे करताना अनियमितता आढळून आल्याने चार कृषि केंद्र धारकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
सम्राट कृषि सेवा केंद्र, पडळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, बलभीम विकास सेवा केंद्र, पोखले ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, गोपालेश्वर वि. का. स.(विकास) सेवा संस्था जाखले ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, स्वरूप कृषि सेवा केंद्र, पिंपळे तर्फ ठाणे, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
त्याचप्रमाणे सहा खत विक्री केंद्र धारकांचे परवाने निलंबित करण्यात आले ते पुढील प्रमाणे –
हनुमान शेती सेवा केंद्र भडगाव, ता. कागल, श्री टाईल्स ॲण्ड ट्रेडर्स फर्टिलायझर म्हाकवे, ता. कागल, भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघ पिंपळगांव ता. भुदरगड , शेतकरी कृषि सेवा केंद्र, आवळी ता.पन्हाळा, जोतिर्लिंग सहकारी भात खरेदी विक्री संस्था मर्या. खोतवाडी ता. पन्हाळा, विनय अॅग्रो कृषि सेवा केंद्र, कोडोली ता. पन्हाळा, गोल्डन अॅग्रो इनपूटस, रूकडी ता. हातकणंगले, बळीराजा शेती सेवा केंद्र निळपण ता. भुदरगड, शेतकरी सहकारी ता.ख विक्री संघ यवलूज ता. पन्हाळा, पांडूरंग कृषि सेवा केंद्र कोतोली रोड माळवाडी ता. पन्हाळा, जाधव कृषि सेवा केंद्र कोतोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, विघ्नेश फर्टिलायझर्स तिरपण ता. पन्हाळा, यशवंत सहकारी तालुका खरेदी विक्री संघ लि. शाखा यशवंत बझार बाजार भोगाव ता. पन्हाळा, श्री हनुमान वि.का.स. (विकास) संस्था मर्या. कुशिरे ता. पन्हाळा, श्री. बलभीम विकास (वि) सेवा संस्था मर्या. क. बोरगाव (खत विभाग) ता. पन्हाळा तसेच बापूसो कृषि सेवा केंद्र कुंभोज (किटकनाशक) ता.हातकणंगले या किटक नाशक कृषि केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
सन २०२१-२२ मध्ये सल्फर ९० टक्के खताची विना परवाना विक्री करत असताना श्रावण कृषि सेवा केंद्र शिरोळ व खत उत्पादक रूक्मीनी अॅग्रो सर्व्हिसेस, सांगली यांच्यावर पोलिस केस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बापूसो कृषि सेवा केंद्र कुंभोज या किटक नाशक विक्री केंद्र व जे.बी.सी. क्रॉप सायन्स वापी गुजरात या उत्पादक किटक नाशक कंपनीवर पोलिस केस दाखल करण्यात आली आहे. तसेच बापूसो कृषि सेवा केंद्र कुंभोज या किटक नाशक विक्री केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे.