सांगरुळ फाटा कोपार्डे येथे स्वाभिमानीचे रास्ता रोको
करवीर :
शेती पंपाला दिवसा १० तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत
सांगरुळ फाटा कोपार्डे येथे स्वाभिमानीचे सर्वपक्षीय सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी वाहतूक ठप्प झाली, पोलिस बंदोबस्त होता.
यावेळी बाजीराव देवाळकर म्हणाले सध्याच्या सरकारने शेतीसाठी २४ तास वीज देऊ असे सांगितले होते त्याचा त्यांना विसर पडला आहे. अनेक दिवस आंदोलन करूनही सरकार दाद देत नाही हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी वीज बिल भरू नये, वायरमन यांनी वीज तोडली तर दोन हात करू असा इशारा दिला. पांडुरंग शिंदे म्हणाले शेतकरी व सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, यापुढेही पाठिंबा मिळावा .जिल्ह्यात तीन मंत्री, आमदार खासदार आहेत मात्र वीजेचा प्रश्न सुटलेला नाही. सुनील कापडे यांनी शेती पंपाला दिवसा दहा तास वीज मिळावी अशी मागणी केली.
यावेळी बाजीराव देवाळकर, सर्जेराव पाटील, गुणाजी शेलार ,पांडुरंग शिंदे ,संभाजी चौगले, सुभाष पाटील, कुंडलिक कांबळे ,अर्जुन पाटील, सर्जेराव पाटील, विठ्ठल पाटील, रणजित पाटील ,सागर बुरूड, डिके कोपार्डेकर अनिल मोळे कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.