कोल्हापूर :
संत सेवालाल महाराज २८२ वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांचे होते.आता लमाण बंजारा समाजातील लोकांनी पारंपरिक रूढी परंपरा मधून बाहेर पडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, असे प्रतिपादन मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले.

लमाण समाज विकास संघाच्या वतीने शाहू स्मारक भवनमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कोल्हापुरात दसरा चौक येथे गेली पंचवीस वर्षे फोटो पूजन व जयंतीचा कार्यक्रम केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लमान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामचंद्र पवार होते.
यावेळी बोलताना म्हणाले मुलांच्या शिक्षणासाठी समाजाने एकत्र यावे,या समाजातील लोक खुदाया आणि बांधकाम व्यवसाय नोकरी करत आहेत, यामुळे एका ठिकाणी कायमस्वरूपी राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले.
बाळासाहेब भोसले, कादरभाई मलबारी, बबनराव रानगे,रामचंद्र पवार, अशोक लाखे, प्रकाश सातपुते, शिवाजी पवार ,रवींद्र राठोड ,यांचे मनोगत झाले. संतोष राठोड यांनी सूत्रसंचालन केले, संगिता राठोड ,प्रकाश चव्हाण ,राजू राठोड ,किसन राठोड, पांडुरंग पवार ,पुंडलिक चव्हाण उपस्थित होते. रोहिदास राठोड यांनी नियोजन केले.