जिल्हा परिषद व पंचायत समितींचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. निवडणुकीसाठी
प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. या आराखड्यामध्ये काही बदल आयोगाने सुचवले आहेत. हे बदल करून पुन्हा हा आराखडा आयोगाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी दिली आहे. बदललेल्या आराखड्यानुसार नवीन 9 प्रभाग होणार आहेत. प्रभाग रचना झाल्यानंतर त्याचेवर हरकती मागवूनचं प्रभाग रचनेचा आराखडा अंतिम केला जाणार आहे. या नंतर आरक्षण सोडत निघणार आहे.