करवीर :
करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या सभेमध्ये सरपंच उपसरपंच पदाच्या निवडी घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण करवीर तालुक्यातील कोगे व खुपीरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ९ फेब्रुवारीला होणारी सरपंच उपसरपंच निवडी १६ फेब्रुवारी पर्यंत रोखून ठेवण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी या निवड २५ फेब्रुवारीला करण्याचे आदेश दिल्याने सरपंच उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 28 तरतुदीप्रमाणे नवनिर्वाचित सदस्यांची पहिली सभा सरपंच-उपसरपंच निवडीसाठी बोलवणे आवश्यक असते. सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसेच वरील कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांची निवड निवडणूक मतदानानंतर ३० दिवसाच्या आत राबवण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने २१ जानेवारीला आदेश केला होता.
पण कोगे व खुपीरे येथे सर्वसाधारण महिला आरक्षणाला आव्हान देणारी याचिका अनुक्रमे विश्वास पाटील व अंकुश कांबळे यांनी दिल्याने ही निवड १६ फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. जिल्हा अधिकाऱ्यांच्या समोर या याचिकेची सुनावणी झाली. पण करवीर तालुक्यातील सर्वच्या सर्व ५४ ग्रामपंचायतीचे आरक्षण जैसे थे ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच २०२० ते २५ दरम्यान निवडणूक होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीचे आरक्षण ही जैसे थे ठेवण्यात आले आहे. यामुळे सरपंच उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे
(निवडणूक झालेल्या ५४ ग्रामपंचायतीचे आरक्षण पुढील प्रमाणे)
१)कोपार्डे – ना.मा. प्रवर्ग,
२)आडूर – सर्वसाधारण ३)आमशी – सर्वसाधारण स्त्री ४)उपवडे- अनुसुचित जाती स्त्री ५)खाटांगळे- अनुसूचित जाती स्त्री६) कुडित्रे- सर्वसाधारण स्त्री ७)कळंबे तर्फ कळे- सर्वसाधारण ८) भामटे – अनुसुचित जाती स्त्री ९) तेरसवाडी- सर्वसाधारण १०)घानवडे -अनुसूचित जाती स्त्री ११) गर्जन – सर्वसाधारण १२)चाफोडी -सर्वसाधारण १३) पाटेकरवाडी -नागरिकांचा मागास प्रवर्ग १४)म्हालसवडे – अनुसूचित जाती १५)आरे-सर्वसाधारण १६)बाचणी- सर्वसाधारण १७)म्हारूळ- सर्वसाधारण स्त्री १८) गाडेगोंडवाडी – अनुसुचित जाती स्त्री १९)महे – सर्वसाधारण २०)वाडीपीर – सर्वसाधारण स्त्री २१)निगवे दुमाला- सर्वसाधारण स्त्री २२)पडवळवाडी – सर्वसाधारण २३) भुयेवाडी -अनुसुचित जाती २४) केर्ली -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री २५)शिये- सर्वसाधारण स्त्री २६)हळदी – नागरिकांचा मागास प्रवर्ग २७) देवाळे -सर्वसाधारण स्त्री २८)बेले- सर्वसाधारण स्त्री २९) कोथळी- सर्वसाधारण स्त्री ३०) कुरुकली- सर्वसाधारण ३१) येवती — सर्वसाधारण ३२) कुर्डू- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३३) सडोली खा.- सर्वसाधारण ३४)बालिंगे -नागरिकांचा मागास प्रवर्ग ३५) रजपुतवाडी – सर्वसाधारण स्त्री ३६) शिंदेवाडी– सर्वसाधारण स्त्री ३७)साबळेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ३८)पाडळी खुर्द – सर्वसाधारण ३९) हणमंतवाडी –सर्वसाधारण ४०) नागदेवाडी – सर्वसाधारण ४१) इस्पुर्ली -सर्वसाधारण ४२) नंदगाव – अनुसूचित जाती ४३) खेबवडे -अनुसूचित जमाती ४४) वडकशिवाले-अनुसूचित जाती स्त्री ४५) गिरगाव -अनुसूचित जाती ४६) कोगील बुद्रुक सर्वसाधारण स्त्री ४७)कोगिल खु. – सर्वसाधारण ४८) तामगाव -नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ४९) गडमुडशिंगी – सर्वसाधारण स्त्री ५०)न्यू वाडदे – अनुसुचित जाती स्त्री ५१)सांगवडे – नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री ५२) हलसवडे – सर्वसाधारण स्त्री ५३)कोगे – सर्वसाधारण स्त्री ५४) खुपिरे – सर्वसाधारण स्त्री.