अनुकंपा तत्वावरील तलाठी, गट क व ड संवर्गातील पात्र उमेदवारांची नियुक्ती
निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव
कोल्हापूर :
सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 11 सप्टेंबर 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2015-16 ते 2020-21 पर्यंत अनुकंपा तत्वावर रिक्त पदे भरण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली. जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयाकडून प्राप्त मागणीनुसार गट क संवर्गातील एकूण 35 पात्र उमेदवार व गट ड संवर्गातील 37 पात्र उमेदवारांना इतर शासकीय कार्यालयाकडून अनुकंपा तत्वावर नियुक्त्या दिल्या आहेत. अनुकंपा तत्वावर 20 टक्के प्रमाणे सन 2020-21 या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट क तलाठी संवर्गातील रिक्त पदावर एकूण 05 पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या दिल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 11 सप्टेंबर 2014 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुकंपा नियुक्तीच्या भरतीसाठी असलेली 10 व 20 टक्केची मर्यादा शिथील करुन, वित्त विभागाचे ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध आहेत आणि ज्या पदांच्या भरतीवर निर्बंध नाहीत अशा सरळ सेवेच्या कोटयातील सर्व पदांच्या बाबतीत गट क व गट ड मधील प्रतिवर्षी रिक्त पदाच्या 20 टक्के पदे अनुकंपा नियुक्तीव्दारे भरण्यात यावीत, असे नमूद केलेले आहे.