गोकुळ दूध संघात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर दि.२६:
प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास नारायण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, देश हा आता सध्या भयानक महामारी तून जात आहे या कालावधीत सुद्धा गोकुळने दूध उत्पादक शेतकरी यांना आर्थिक हातभार लावून त्यांना मदत केली आहे. यासाठी संघाचे कर्मचारी व अधिकारी यांनी जिवाची पर्वा न करता चांगले काम केले संघाची उन्नती हीच देशाची उन्नती यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू.तसेच त्यांनी यावेळी संघाचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक शेतकरी, वितरक व ग्राहक, वाहतूक ठेकेदार, यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संघाचे ताराबरार्इ पार्क येथील आवारात संचालक अभिजीत तायशेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले. तसेच जिल्हातील विविध ठिकाणी असणा-या संघाच्या दूध शितकरण केंद्रावरही राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करणेत आले. गोगवे चिलिंग सेंटर संचालक अमरसिंह पाटील, गडहिंग्लज चिलिंग सेंटर संचालक नविद मुश्रीफ, बिद्री चिलिंग सेंटर संचालक नंदकुमार ढेंगे, शिरोळ चिलिंग सेंटर संचालक डॉ. सुजित मिणचेकर, तावरेवाडी चिलिंग सेंटर संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना कागल येथे संचालक किसन चौगले, व मुडशिंगी येथील पशुखाद्य कारखाना येथे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या हस्ते करणेत आले.
यावेळी संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक-प्रशासन डी.के.पाटील, सुरक्षा अधिकारी कुंडलिक कदम, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.