पाच वर्षात शहरातील ड्रेनेजचे काम 100% पूर्ण करणार – ना. सतेज पाटील
राजारामपुरी, दौलत नगर, प्रतिभा नगरमधील विविध विकासकामांचा शुभारंभ
कोल्हापूर :
पुढील पाच वर्षात शहरातील शंभर टक्के ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून शहराला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील राजारामपुरी एक्सटेन्शन,दौलत नगर, प्रतिभा नगर मधील विविध विकास कामांचा शुभारंभ पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या विशेष निधीतून राजारामपुरीतील प्रभाग क्रमांक 39 मधील रस्ता डांबरीकरण आणि ड्रेनेज पाईप लाईनसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. या कामाचा शुभारंभ ना. सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी झाला. राजारामपुरी एक्सटेंशन, राधाबाई शिंदे शाळा, मंडलिक पार्क, एसटी कॉलनी येथील ड्रेनेज पाईप लाईनसाठी 50 वर्षात प्रथमच नाम. पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या फंडातून विशेष निधी उपलब्ध झाला आहे.
यावेळी बोलताना नाम. सतेज पाटील यांनी ड्रेनेजचा दुसरा टप्पा 90% पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यासाठी पुढील 5 वर्षात शहरातील ड्रेनेजचे काम अमृत योजनेतून पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तसेच राजारामपुरीमध्ये असलेल्या स्विमिंग टॅंकसाठी आणि राजाराम तलावाभोवती वॉकिंग ट्रॅकसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी नाम. सतेज पाटील यांनी दिली.
दरम्यान दौलतनगर येथे प्रभाग क्रमांक 40 येथे दलित वस्ती सुधारणा योजनेतून 1 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी अंतर्गत करण्यात आलेल्या तीन बत्ती रस्ता डांबरीकरण कामाचे उदघाटन नाम. पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग क्रमांक 41 येथील ड्रेनेज आणि कॉंक्रिटीकरण, प्रभाग क्रमांक 42 पंजारपोळ येथील विकास कामांचा शुभारंभही यावेळी झाला.
यावेळी गिरीष देशमूख, सामाजिक कार्यकर्ते अनुप पाटील, ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील, वैशाली पाटील, राजू लिंग्रज, कमलाकर जगदाळे, कामगार सोसायटीचे संजय पाटील, संदीप वाडकर, तानाजी हिरुगडे, संतोष हिरुगडे, जीवन इंदुलकर, मा. नगरसेवीका संगीता देवेकर , मा. नगरसेवक सुरेश ढोणूक्षे, अमर मोहिते, उमेश पवार, अनिल कलकुट्टी, अनिल दिवेकर, छाया पोवार, सुरेश माने, धनाजी सरदेसाई, शशिकांत मोघने, विजय जाधव, प्रकाश एडगे, सलीम गजबर, विजय पाटील, संजय काटकर, बी. एच. कुऱ्हाडे, अरुण चौगले, सर्जेराव साळुंखे, महेश कोरवी, अनिल काटकर, विशाल राजपुरे, महेश सरनाईक , जितू ढोबळे, अमोल देशिंगेकर , विनोद सातपुते , काका पाटील, वसंत कोगेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.