चेअरमन रविंद्र आपटे
कोल्हापूर :
गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून वैयक्तिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिव विचारच मार्गदर्शक ठरत आहेत, असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी केले, शिवजयंतीनिमित्त संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संघाच्या ५८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये व्हिडिओ क्लिपद्वारे आपण लवकरच सर्वांच्या भेटीला येत आहोत, असे त्यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे आज शिवजयंती निमित्ताने त्यांनी गोकुळच्या कार्यालयीन कामकाजात भाग घेत आपण तंदुरुस्त आहोत, याची झलक दाखवली.
गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील त्यांचे जल्लोषात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या निमित्त जिल्ह्याचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व चेअरमन रविंद्र आपटे यांनी शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला आणि सर्वांनी त्यांना वंदन केले.
यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक, चेअरमन रविंद्र आपटे , माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण नरके, रणजितसिंह पाटील, जेष्ठ संचालक विश्वास जाधव, संचालक दिपक पाटील, उदय पाटील, बाळासो खाडे, अमरिशसिंह घाटगे, सत्यजीत पाटील, विजय तथा बाबा देसाई, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी, एस. एम. पाटील,व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील, जनसंपर्क अधिकारी पी.आर.पाटील, चेतन नरके, रघु पाटील व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.