देशाचे पुढील उपसेनाप्रमुख : केंद्राने पूर्व
लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला
दिल्ली :
केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय सुरक्षा दलाच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही. मात्र, सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत.
केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांनी दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.
ANI Digital
@ani_digital
Lt Gen Manoj Pande appointed as next Army Vice Chief: Sources
Read @ANI Story | https://aninews.in/news/national/general-news/lt-gen-manoj-pande-appointed-as-next-army-vice-chief-sources20220118144100/
जनरल पांडे…..
यांची डिसेंबर १९८२ मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्ती झाली. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बर्ली (ब्रिटन) मधून पदवीधर आहे. त्यांनी दिल्लीतील आर्मी वॉर कॉलेज महू आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (NDC) येथे हायर कमांड कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. ३७ वर्षांच्या राष्ट्रसेवेच्या काळात, पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
ले. जनरल पांडे यांनी १ जून रोजी इस्टर्न आर्मी कमांडचे नवीन कमांडर (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) म्हणून पदभार स्वीकारला होता. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्येकडील राज्यांमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्यासाठी पांडे तैनात होते. याचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. लेफ्टनंट जनरल पांडे पूर्व कमांडचे प्रमुख होण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.