उचगाव येथे ‘गोकुळ’ शॉपी चे उदघाटन सोहळा संपन्न
कोल्हापूर (१३) :
उचगाव (ता.करवीर) येथील गोकुळ दूध संघाच्या अधिकृत कुष्णामाई ट्रेडर्स गोकुळ दूध शॉपीचे उदघाटन गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या शॉपीमध्ये गोकुळचे दूध, तूप, पनीर, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आंबाश्रीखंड, बासुंदी इत्यादी सर्व पदार्थ परिसरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
यावेळी गोकुळ दूध संघाचे,संचालक प्रकाश पाटील,कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, सिनेट सदस्य प्रा.मधुकर पाटील,उचगाव सरपंच मधुकर चव्हाण,मार्केटिंग अधिकारी लक्षमण धनवडे, दिनकर पोवार, ईश्वर परमार,सन्नाउल्ला थोरगे, प्रदीप घोटणे, प्रोप्रायटर विकास लाड,अभिजित लाड, इंद्रजित लाड आदी उपस्थित होते.