खत किटकनाशक निविष्ठा विक्रेत्यांसाठी
कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु
कोल्हापूर :
निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मैनेज) हैद्राबाद प्रमाणित ‘कृषि विस्तार सेवा पदविका’ या ५२ आठवड्यांचा (आठवडयातून १ दिवस) प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे सुरू होत आहे. तरी इच्छुक खत व किटकनाशक निविष्ठा विक्रेते तसेच नवीन लायसन्स काढून विक्रेत्यांनी दि. 20 जानेवारीपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
अभ्यासक्रमासाठी किमान पात्रता- इ. १० वी पास. कोर्स फी- परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांसाठी 10 हजार रुपये व परवाना नसलेल्या प्रशिक्षणांर्थींसाठी 20 हजार रुपये. प्रशिक्षणार्थींची क्षमता- ४० (मर्यादित) प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य. कोर्स कालावधी – ४८ आठवडे (आठवडयातून १ दिवस). वेळ- सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत
आवश्यक कागदपत्रे- विहीत नमुन्यातील अर्ज, २फोटो, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, निविष्ठा विक्री परवाना प्रमाणपत्र छायांकित प्रत व कोर्स फीच्या रकमेचा DD/NEFT/RTGS द्वारे बँक खात्यावरती जमा करावी व त्याची प्रत अर्जासोबत जोडावी.
बँकेचा तपशील- A/C Name- PRINCIPAL REGIONAL AGRIL EXT MANAGEMENT INSTITUTE KOLHAPUR
Bank-State Bank of India, Branch- Kolhapur Treasury, Kolhapur
IFC Code SBIN0007249, Account No-32549887057
संपर्क –९९७५०३९१६1, ९९२११९२६९४, ९४०४९५४४०९
कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातीलच खत/किटकनाशक निविष्ठा विक्रेत्यांनी अर्ज करावेत. प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी प्रथम सोबतच्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहीती भरावी.
विहित पात्रता धारण न करणा-या रासायनिक खते/किटकनाशके विक्रेत्यांना परवाना नुतनीकरणामध्ये तांत्रिक ज्ञानाअभावी अडचण असल्याने अशा विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य राहील. संस्थेस प्राप्त होणारे अर्ज प्रवेश उपलब्ध क्षमतेनुसार अभ्यासक्रमास प्रवेश निश्चित करण्याचे अंतिम अधिकार संस्थेकडे राहतील.