कुरुकली येथे ४ जानेवारीला आमदार चषक २०२२ क्रिकेट स्पर्धा
कोल्हापूर :
आमदार पी.एन.पाटील सडोलीकर यांच्या वाढदिवसानिमित मंगळवार दि . ४ जानेवारी रोजी आमदार चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कुरुकली कॉलेज कुरुकली येथे करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक करवीर तालुका संजय गांधी निराधार योजना कमिटीचे अध्यक्ष संदीप पाटील कुर्डूकर यांनी दिली.
स्पर्धेतील प्रथम, द्वितीय , तृतीय, चतुर्थ व उत्तेजनार्थ विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार, ३ हजार , ३ हजार व प्रत्येकी चषक अशी बक्षिसे आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे , असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक प्रा. शिवाजी पाटील, शिवाजी कारंडे, माजी संचालक बी.ए. पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, कुरुकली सरपंच रोहित पाटील, तुषार पाटील, प्रभाकर पाटील, सरदार पाटील, कृष्णा धोत्रे, महादेव पाटील, अशोक पाटील कुर्डुकर, मनोज पाटील, लखन भोगम आदी उपस्थित होते.