अनुदान मिळण्यासाठी बँक खाअनुदान मिळण्यासाठी बँक खाते अद्यावत करावेते अद्यावत करावे

तहसिलदार शितल मुळे-भामरे

कोल्हापूर :

करवीर व शहरामध्ये माहे जुलै मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबे, पडझड झालेल्या घरांचे, गोठ्यांचे मयत व वाहून गेलेल्या पशुधनाचे तसेच कृषी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून अनुदानाची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. ज्यांचे खाते बंद आहे, बँक मर्ज झाली आहे किंवा अन्य तांत्रिक कारणास्तव ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम अद्यापही वर्ग झालेली नाही, त्यांनी पंचनामे करतेवेळी सादर केलेले बँक खाते अद्यावत करुन किंवा अन्य बँकेचे पासबुक सादर करावे, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा करवीरच्या तहसिलदार शितल मुळे-भामरे यांनी केले आहे.

व्यावसायिक/ कारागीर (छोटे गॅरेज/ छोटे उद्योग/ व्यावसायिक, हस्तकला/ हातमाग कारागीर/ बारा बलुतेदार, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक व इतर) बाधितांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अद्यावत बँक खाते सादर करतेवेळी संपर्क साधावयाच्या कार्यालयाचे नाव
अनुदानाचा प्रकार-संपर्क करावयाच्या कार्यालयाचे नाव खालीलप्रामणे-
सानुग्रह अनुदान, घर पडझड/ गोठा पडझड अनुदान व्यावसायिक, टपरीधारक, बारा बलुतेदार यांसाठीचे अनुदान- शहरी भागात -कोल्हापूर मनपा येथील ब्युरो कार्यालय व ग्रामीण भागात- संबंधित गाव तलाठी कार्यालय, ग्राम पंचायत कार्यालय.

कृषी पिकांच्या नुकसानीचे तसेच खरबडून गेलेल्या जमीनींसाठीचे अनुदान- शहरी भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच करवीर, कसबा बावडा, जाधववाडी उंचगाव कृषी सहायक व ग्रामीण भागात- तालुका कृषी अधिकारी कार्यालय, करवीर तसेच संबंधित गावचे कृषी सहायक याप्रमाणे राहील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!