गोकुळ’ देशाच्या दुग्ध व्यवसायात क्रांती घडवेल : पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील
कोल्हापूरःता.१५.
गोकुळ दूध संघास बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी गोकुळ प्रकल्पास आज बुधवारी भेट दिली. त्यावेळी स्वर्गीय आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांचे स्वागत संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी संचालक मंडळाच्या उपस्थित केले.
यावेळी बोलताना पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. त्याचे सर्व श्रेय ‘गोकुळ’ दूध संघाला जाते. भविष्यात ‘गोकुळ’ देशाच्या दुग्ध व्यवसायात क्रांती घडवेल असे गौरउद्गार काढले. तसेच गोकुळचे व माझे ऋणानुबंध जुने असून माझी व स्वर्गीय चुयेकर साहेबांची मैत्री राजकारणापलीकडे होती. गोकुळची नेत्रदीपक प्रगती पाहून आनंद वाटतो. गोकुळने भविष्यात २० लाख लिटर्स संकलनाचा टप्पा पूर्ण करून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून द्यावा. सहकारामध्ये काम करताना शांत व संयमाने वागावे कोणाचाही द्वेष करू नये, आपले काम प्रामणिकपणे करावे, असा मोलाचा सल्लाही दिला.
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील, डी.वाय दादांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर,आमदार ते अगदी राज्याचे राज्यपाल तसेच दादांचे शैक्षणिक, कृषी व इतर क्षेत्रातील योगदान आम्हास प्रेरणादायी आहे. दादांचा वारसा डॉ. संजय डी. पाटील व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व त्यांचे कुटुंबीय यशस्वीपणे पुढे नेत आहेत.
गोकुळ दूध संघाचे संकलन, वितरण व इतर दैनंदिन कामकाज विषयी सविस्तर माहिती श्री. पाटील यांनी दिली. निवडणुकीनंतर २० लाख लिटर्स दूध संकलनाचा संकल्प नव्या संचालक मंडळाने केला असून तो लवकरच पूर्ण करू असे मनोगत व्यक्त केले.
जुन्या आठवणीना उजाळा देताना श्री विश्वास पाटील म्हणाले कि स्व. चुयेकर साहेब व संघाचे संचालक मंडळ दादाची भेट घेण्यासाठी गेले असता दादांनी नवी मुंबई (नेरूळ) येथील पाच एकर जागा गोकुळ संघास घेण्यासाठी सांगितले होते. परुंतु तत्कालीन परिस्थिती मुळे जागा घेवू शकलो नाही यांची खंत आजही वाटते. यातून दादांचा दुरदृष्टीपणा दिसून येतो.दादांचे मौलिक मार्गदर्शन संघास नेहमीच प्रेरणादायी राहील.
यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बयाजी शेळके, सुजित मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले व आभार संचालक शशीकांत पाटील चुयेकर यांनी मानले. संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, इतर मान्यवर संग्राम गायकवाड,नंदू पाटील,बाळासाहेब देसाई, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.