आम. पी. एन.पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल : 231 ठरावधारकांची उपस्थिती
कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी करवीर तालुका विकास सेवा संस्था गटातून आमदार पी एन पाटील सडोलीकर यांनी आज मोठ्या शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी 251 पैकी 231 ठरावधारकांनी उपस्थिती लावली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉल मध्ये सर्व ठराव धारकांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी गेली पस्तीस वर्षे जिल्हा बँकेचा संचालक व पाच वर्ष चेअरमन म्हणून काम करताना कोणताही गट तट पक्ष न पाहता सर्वांना सोबत घेऊन बँकेचा कारभार केला आहे .पाच वर्षे चेअरमन असताना शेतकर्यांना व्याजात 2 टक्के सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला होता. जिल्हा बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस व शेतकरी सक्षम बनविण्याचे काम प्रामाणिकपणे केले आहे. जिल्हा बँक जिल्ह्याच्या विकासाची कामधेनू असून आगामी काळात सर्वसामान्यांच्या विकासासाठी वचनबद्ध आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले.
जिल्हा बँकेची निवडणूक करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.आज आमच्या सोबत 251 पैकी 231ठराव आहेत. आणखी काही ठराव धारकांनी येऊ न शकल्याने फोनवरून पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे ही संख्या 237 पर्यत जाते.त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परीषदेचे अध्यक्ष राहुल पाटील सडोलीकर,गोकुळचे अध्यक्ष विश्वासराव पाटील,श्रीपतराव दादा बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील सडोलीकर,जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरूळकर,बाजार समितीचे माजी अध्यक्ष दशरथ माने,शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष जी.डी.पाटील,गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे,माजी संचालक उदय पाटील,सत्यजित पाटील,पी.डी.धुंदरे जिल्हा बँकेच्या संचालिका उदयानीदेवी साळोखे,करवीरचे माजी सभापती बी.एच.पाटील, राजेंद्र सुर्यवंशी,अश्वीनी धोत्रे,विजय भोसले,प्राचार्य आर.के.शानेदिवाण,कुंभी कासारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील(तात्या)बाजार समितीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील,काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे,आप्पासाहेब माने,,संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संदीप पाटील,मानसिंग बोंद्रे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शंकरराव पाटील,बबन रानगे,भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील,सर्व आजी माजी संचालक यशवंत बँक अध्यक्ष एकनाथ पाटील ,अमर पाटील(शिंगणापूर),सुशिल पाटील, डॉ के एन पाटील,नगरसेवक राहुल माने, रणजीत पाटील, आदीसह ठरावधारक व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी आ.पाटील यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला.