अवकाशातील ताऱ्यांच्या विलोभनीय फोटोची दिवाळी भेट

नासाने दिल्या दिवाळीच्या हटके शुभेच्छा

Tim Global :

नासाने दिवाळी साठी हटके शुभेच्छा दिल्या .  प्रकाशाची उधळण करणाऱ्या अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाचा एक फोटो नासाने वापरला आहे. ‘ Happy Diwali to all who celebrate!’असं या संदेशात नासाने म्हंटलं आहे.

दिवाळीमध्ये प्रकाशाचा झगमगाट आणि फटाक्यांमुळे वेगवेगळ्या रंगांची उधळण होत असते, अशी उधळण अवकाशातही कायम सुरु असल्याचं फोटोच्या माध्यामातून शुभेच्छा देतांना नासाने सांगितलं आहे.

NASA
@NASA
✨ Happy #Diwali to all who celebrate!

This stellar festival of lights, called a globular cluster, was captured by @NASAHubble. It contains a densely-packed collection of colorful stars close to the heart of the Milky Way: https://go.nasa.gov/3GRHnrS
5:23 AM · Nov 5, 2021

ताऱ्यांच्या समूहाकडून होत असलेलली प्रकाशाच्या उधळण म्हणजे अवकाशातील globular cluster आहे. नासाच्या हबल या अवकाश दुर्बिणीने हा फोटो घेतला असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे. या फोटोत असंख्य तारे दिसत असून ते विविध रंगांच्या प्रकाशाची उधळण करत आहेत. ताऱ्यांचा हा समूह आकाशगंगेचे केंद्र-मध्यभाग असलेल्या ठिकाणापासून जवळ आहे.

ताऱ्यांचे फोटो घेणे हे खूप आव्हानात्मक असल्याचं नासाने सांगितलं आहे. कारण ताऱ्यांमध्ये असलेला अवकाशात हा वायू-धुळीने भरलेला असतो. असं असलं तरी हबल, चंद्रा-एक्सरे सारख्या अवकाश दुर्बिणींमुळे अशा ताऱ्यांचे फोटो घेणं शक्य झालं असल्याचं नासाने स्पष्ट केलं आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!