घरकुल : यादीतील किती लाभार्थी अपात्र
: जाणून घ्या
करवीर तालुक्यातील चित्र
Tim global :
घराचा जिव्हाळ्याचा प्रश्न लाभार्थ्यांना जिव्हारी लागला आहे, घराचे स्वप्न बाळगून गेली अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या करवीर तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीतील चौदा हजार लाभार्थ्यांना केंद्रशासनाने अपात्र केले आहे, यामुळे अपात्र लाभार्थ्यांच्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. सर्व घटकाच्या लाभार्थ्यांनी या योजनेत अर्ज दाखल केले होते.
लाभ….
एक लाख वीस हजार रुपये यामध्ये अनुदान मिळणार आहे, आणखी स्वतः कामे केल्यास रोजगार हमीचे २१ हजार रुपये मिळणार आहेत.
यादी….
२०१६ मध्ये घरकुल ड यादी तयार करण्यात आली, यामध्ये २८ हजार १८५ इतक्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. नुकतीच केंद्र शासनाने यामध्ये छाननी केली, यामध्ये जे लाभार्थी टॅक्स भरतात, दुचारचाकी गाडी आहे, लँडलाईन फोन आहे, गरजे पेक्षा जास्त जमीन आहे, पक्के घर आहे,आणि किसान कार्ड आहे, तसेच रमाई योजना, यशवंतराव चव्हाण योजना,धनगर वसाहत योजनेचा लाभ घेतलेले लाभार्थी अशा नागरिकांना यामधून वगळण्यात आले आहे. पहिल्या छाननीमध्ये १४ हजार ३४५ लाभार्थी पात्र ठरले आहेत.यामध्ये दरवर्षी उदिष्ट येईल त्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.
सर्वे….
पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी दोन ऑक्टोबर च्या ग्रामसभेत दिली गेली असून यादी पंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नुकतेच विस्ताराधिकारी यांनी थेट घरांना भेटी देऊन पुन्हा सर्वे केला आहे ,यामध्येही अनेक लाभार्थी अपात्र होण्याची शक्यता आहे, त्यामध्ये प्रामाणिक लाभार्थी वंचित राहिल्यास त्यांनी ग्रामसभेला ठराव करून पुन्हा मंजुरी बाबत पंचायत समिती येथे संपर्क साधावा लागणार आहे.असे पंचायत समितीच्या सूत्रांनी सांगितले आहे.
मंजूर घरे…..
महागाई वाढल्यामुळे सव्वा लाखा मध्ये एक खोली आणि शौचालय उभे राहत नाही, यामुळे लाभार्थ्यांना कर्ज काढून पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागत आहे. दरम्यान यशवंतराव चव्हाण योजनेत ८५ लाभार्थ्यांना घरे मंजूर आहेत, पण पैसे उपलब्ध झाले नसल्यामुळे या घरांची कामे प्रलंबित राहिली आहेत.
करवीर तालुक्यातील घरकुल योजना २०२१/२२ व मंजुर घरे,रमाई आवास १९२ मंजूर ,यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत ८५ मंजूर ,प्रधानमंत्री आवास योजना २४० मंजूर.
अनुदान…..
वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे, राहण्यास योग्य घर नाही अशा लाभार्थ्यांना घर मिळाले पाहिजे.अनुदान रक्कमही वाढविण्यात यावी.