पुन्हा पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ :
मुंबईत पेट्रोल ₹ ११४.४७ प्रति लीटर , डिझेल ₹ १०५.४९ प्रति लीटर
Tim Global :
आज पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ झाली . सलग तिसऱ्या दिवशी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रति लिटर ३५-३५ पैशांनी वाढवल्या . बुधवारपासून दरात सातत्याने वाढ होत आहे. एका महिन्यापासून तेल कंपन्या पेट्रोलच्या किमती वाढवत आहेत. तेव्हापासून आतापर्यंत २४ वेळा पेट्रोलच्या दरात ७.४५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, डिझेलच्या दरात २५ वेळा वाढ झाली असून आतापर्यंत ८.७५ रुपयांनी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरू असून १७ टक्के वाढ झाली आहे.
प्रमुख महानगरातील आजचे दर असे….
मुंबई : पेट्रोल – ₹ ११४.४७ प्रति लीटर , डिझेल – ₹ १०५.४९ प्रति लीटर,
दिल्ली : पेट्रोल – ₹१०८.६४ प्रति लीटर , डिझेल – ₹९७.३७ प्रति लीटर,
कोलकत्ता पेट्रोल – ₹ १०९.१२ प्रति लीटर , डिझेल – ₹१००.४९ प्रति लीटर.