23 ऑक्टोबरला पोलीस शिपाई
परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण ७८ पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी पोलीस भरतीकरीता सन २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यापैकी ७५ पोलीस शिपाई पदाकरीता आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वा ते ११.३० या वेळेत कोल्हापूर शहरातील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) त्यांच्या ई-मेलवर दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र http://mahapolicerc.mahaitexam.in/ या पोर्टलवर/संकेतस्थळावरुन देखील डाऊनलोड करता येतील.
या परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता ओळखपत्रावर नमूद असलेल्या परीक्षाकेंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे.

उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांनीमदतीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक :- ९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ९३०९८६८२७०, ९४२३१६२३९५
कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्ष :- ०२३१-२६५६७११/२६०१९५०
  या दूरध्वनी/ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!