कोल्हापूर :
भारत सरकार वित्त मंत्रालय व एसएलबीसी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यामध्ये अग्रणी जिल्हा कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने सर्व बँकांचा क्रेडीट ऑउटरिच कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुर जिल्ह्यासाठी दि. 11 ऑक्टोबर रोजी श्रीराम सांस्कृतिक हॉल, बाजार पेठ जवळ, कसबा बावडा, कोल्हापूर येथे व दि. 13 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हॉटेल निलकमलच्या मागे, गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती अग्रणी जिल्हा प्रबंधक गणेश शिंदे यांनी दिली.
मेळाव्यामध्ये किसान क्रेडीट कार्ड, एमएसएमई व रिटेल ग्राहकांसाठी बँकांच्या कर्जसुविधा, स्टॅडअप इंडिया, पीएम स्वनिधी, मुद्रा, पीएमईजीपी, सीएमईजीपी तसेच अन्य केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना, कृषी पायाभूत सुविधा, पशुपालन इन्फ्रास्ट्रक्चर विकास निधी योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या बँकेच्या व शासन पुरस्कृत योजनांची ग्राहकांना माहिती तसेच मार्गदर्शन मिळणार आहे.
अग्रणी जिल्हा कार्यालयाच्या अधिनस्थ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व बँका या मेळाव्यामध्ये सामील होणार आहेत. शासन पुरस्कृत तसेच बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहिती ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार असल्याने कर्ज इच्छुक ग्राहकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा.