दूधवाढीसाठी सभासदांच्या पाठीशी गोकुळ ठामपणे उभा : चेअरमन विश्वास पाटील ( बीडशेड येथे म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रम मेळावा)
करवीर :
बीडशेड ता.करवीर येथील महालक्ष्मी मल्टिपर्पज हॉल येथे गोकुळ दूध संघाच्या वतीने करवीर तालुका म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रम मेळावा पार पडला. प्रारंभी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दूध उत्पादकांच्या वतीने चेअरमन विश्वास पाटील यांचा विशेष सत्कार संपन्न झाला.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील(आबाजी) म्हणाले, गोकुळ दूध संघ व जिल्हा बँक जिल्ह्याच्या शिखर संस्था आहेत. या दोन चाकांमुळे विकासाला गती मिळेल. गोकुळच्या दुधाला मोठी मागणी आहे. त्यामानाने संघाला म्हैस दुधाचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे जिल्ह्यातील सभासदांनी जास्तीत जास्त दूध उत्पादन घेऊन संघाचे दूध संकलन वाढवावे म्हणून म्हैस दूधवाढीचा संकल्प हाती घेतला आहे. यासाठी सभासदांच्या पाठीशी संघ ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन केले.
सुरुवातीला गोकुळ दूध संघाचे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक ऋषिकेश आंग्रे , न्यू इंडिया इन्शुरन्सचे के.वाय.पाटील
डॉ. प्रकाश दळवी, डॉ.उदय मोगले, केडीसीसी बँकेचे विभागीय अधिकारी डी. वाय.कुंभार यांनी म्हैस खरेदी प्रकरणात आपाल्या विभागाची माहिती देताना दूध उत्पादकांनी विचारलेल्या शंकाचे निरसन केले. संजय देसाई, कुंडलिक कारंडे, विलास पाटील, सर्जेराव भोसले, गणेशवाडीचे आनंदा केशव माने आदी प्रश्न मांडले.
गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संचालक अजित नरके, केडीसीसी बँकेचे संचालक व माजी खासदार निवेदिता माने, प्रताप माने, आसिफ फरास यांची भाषणे झाली. संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी आभार मानले.
या मेळाव्यास दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, एस.आर.पाटील, जि. प. सदस्य युवराज पाटील, गोकुळचे माजी संचालक सत्यजित पाटील, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे, माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, राजू लाटकर, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, चेतन पाटील, कुंभी कारखाना संचालक दादादो लाड, कुंभी बँकेचे संचालक पंडित वरुटे, रंगराव पाटील, रयत संघाचे संचालक सचिन पाटील, बलभीम विकास संस्थेचे चेअरमन राहुल पाटील, माधव पाटील, शिरोली सेंटरचे दूध संकलन अधिकारी संभाजी पाटील, भानुदास पाटील, सहायक दूध संकलन अधिकारी के.वाय.पाटील, सिनियर सुपरवायझर संजय पाटील, प्रदीप पाटील, महादेव टिंगे यांच्यासह दूध संस्थेचे चेअरमन, सचिव व दूध उत्पादक उपस्थित होते. आभार संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांनी मानले.