शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश संघटना, बळीराजा शेतकरी संघटनेच्या बैठकीत ठराव

कोल्हापूर :

उसाला उत्पादन खर्चावर आधारित एकरकमी एफआरपी ४५०० रुपये प्रतिटन ॲडव्हान्स मिळावा, असा ठराव कुंभी येथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश संघटना, व बळीराजा शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी संघटनेला पाठिंबा देत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील यांनी यंदा उसाला एफ आर पी ४५०० एकरकमी ऍडव्हान्स मिळावा, जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी असे ठराव करून आमदार यांच्याकडे द्यावेत असा अधिवेशनात ठराव करावा असा ठराव करण्यात आला. कृषी कायदे यांच्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी एफ आर पी चा प्रश्न निर्माण केल्याचे सांगून केंद्र सरकारने कृषी कायदे केले ते कायदे राज्य सरकारने लागू करून घेऊ नये, अशी मागणी केली ,यावेळी एफआरपी थकवलेल्या कारखान्याच्या बाबतीत चर्चा करण्यात आली.

आंदोलन अंकुशचे धनाजी चूडमुंगे यांनी सामुदायिक विरोध केला तरच एक रकमी एफआरपी मिळेल, तीन टप्प्यात दिल्यास १५ टक्के व्याज शेतकऱ्यांना द्यावे लागेल, असे आयुक्तांचे आदेश असल्याचे स्पष्टीकरण दिले. महसुली उत्पन्न नुसार ऊस दर किती बसतो ,तोडणी वाहतूक खर्चात शेतकऱ्यांची लूट केली जाते. याबाबत माहिती दिली.

बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी.पाटील यांनी शासनाने बेस रिकव्हरी वाढवून शेतकऱ्यांचे ४६० रुपये प्रति टन नुकसान केल्याचे स्पष्टीकरण दिले. सरपंच जोस्ना पाटील यांनी एक रकमी एफआरपी देण्यासाठी ठराव केल्याचे सांगून सर्व ग्रामपंचायतीनी ठराव करून आमदारांकडे द्यावे अशी मागणी केली.

युवराज आडनाईक यांनी मनोगत व्यक्त केले, आनंदा पाटील यांनी इतर घटकाचे भरमसाठ दर वाढल्यामुळे ६५०० रुपये दर मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. दादूमामा कामीरे यांचे मनोगत झाले, बदाम शेलार यांनी आभार मानले.

गुणाजी शेलार ,नारायण मोरे,के.
एन.किरुळकर,तानाजी शेलार, युवराज पाटील,तुकाराम आडणाईक, बाजीराव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!